कडा:शेख सिराज― अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न रखडला होता त्यामुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या आज
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले होते. अशा परिस्थितीत गेल्या दोन वर्षापासून या रेल्वे मार्गावर कामाने वेग घेतला.यामुळे आष्टी पर्यंतची रेल्वे ची कामे पूर्ण झाली आज सकाळी दहा च्या सुमारास सोलापूरवाडी येथे रेल्वे चे आगमन झाले . सोलापुरवाडी येथे रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले . त्यानंतर रेल्वे कडा स्टेशन पर्यंत धावली. दुपारनंतर कडा येथून ही रेल्वे आष्टी रेल्वे स्टेशन वर पोहोचली आहे . दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्रॉल्यांवरून रेल्वे मार्गाची तपासणी व पाहणी केली . आष्टी स्थानकावरून ही रेल्वे खा . प्रितम ताई मुंडे यांच्या उपस्थितीत पुन्हा नगरकडे हायस्पीड घेत मार्गस्थ होणार आहे .बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल राज्यात किंवा जिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समाजाला जाणारा रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे अहमदनगर ते आष्टी या साठ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून यासाठी आज सकाळी नगर हुन सोलापूर वाडी ते आष्टी पर्यंत रेल्वे धावली आहे पटरी वरून रेल्वे धावण्याचे पाहून जिल्हावासीयांना स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद ओसंडून वाहत होता
1995 साली या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला तत्वत मंजुरी मिळाली होती मात्र त्यानंतर अनेक वर्षे राजकीय इच्छाशक्ती काम रखडले स्वर्गीय गोपीनाथ राव मुंडे यांनी रेल्वेमार्गासाठी भरपूर योगदान देत पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून या मार्गासाठी भरीव निधीची तरतूद केली सत्य स्थितीत हा प्रकल्प तीन हजार कोटीच्या पुढील असून नगर ते आष्टी 60 किलो मीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली असताना मागील महिन्यात धावणारी रेल्वे तांत्रिक अडचणीमुळे लावली नव्हती पण बुधवारी सकाळी नगर रोड आष्टी च्या दिशेने मार्गस्थ झाली बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून रेल्वेचे स्वप्न होते ते अखेर पूर्णत्वाकडे जात असल्याचे आवाज मिळाले सोलापूर वाडी कडा आष्टी या ठिकाणी रेल्वे धावल्यामुळे ते पाहण्यासाठी यांनी गर्दी केली आली होती दरम्यान दुपारी चारच्या सुमारास याच मार्गावर हाय स्पीड रेल्वे धावणार आहे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते उपस्थित तालुक्यातील कोणते फळ साठवण तलाव येथील सर्वात मोठ्या रेल्वे पुलावरून हायस्पीड रेल्वे बुधवारी सुखरूपपणे धावली 15 स्पनचाअसून प्रत्येकाची लांबी 3.5 मीटर आहे म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर लांबीचा तर शंभर फूट उंचीचा हा पुल आहे.