पाचोरा भडगाव तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली पाहणी
पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―पाचोरा भडगाव तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतीची आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सदाशिव आबा पाटील, भाजपचे नेते जी.प.सदस्य मधुकर काटे, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समितीचे सभापती सुभाष पाटील, तालुका सरचिटणीस प्रदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी ए. व्ही. जाधव, भाजपचे तालुका विस्तारक विकी देशमुख, कृषी पर्यवेक्षक व्ही. एस जाधव, सहाय्यक जितू पाटील, तलाठी युवराज पाटील, राजश्री पेंढारकर, माजी सरपंच रवी आबा पाटील , शेषराव चव्हाण,ग्रामसेवक , शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोह टार येथील बळीराम भोई, कैलास बळीराम पाटील यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शासनाकडे पाठवावेत, शेतकरी हवालदिल झाला असून त्याला मदतीची आणि सहकार्याची गरज असून शेताच्या बांधावर जावून पंचनामे करण्याचे आदेश सूचना यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्यात.अं तुर्ली खुर्द येथील शेतकरी पुरुषोत्तम विश्वनाथ पाटील, बाबाजी विरभान पाटील यांचा शेतातील मक्याच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना दिलासा दिला.
अनेवेळा गावांना भेटी.
पाचोरा तालुक्यात अनेक गावांमध्ये जाऊन खासदार उन्मेश पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यात लोहटार, अंतूर्ली , लोहारी, शिंदा ड , वडगाव कडे आणि पिंपळ गाव हरेश्र्वर या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. तसेच शिदाड येथील शिवाजी भोई यांच्या घराच्या नुकसानीची पाहणी खासदार पाटील यांनी केली.यावेळी भाजपचे पिंपळगांव हरेश्र्वर गटाचे नेते जीप सदस्य मधुकर काटे ,भाजप शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, भाजपचे उपाध्यक्ष शरद पाटील, मार्केट संचालक नरेंद्र पाटील शिनदाडकर,सरपंच राजू पाटील, सतीश पाटील, काशीनाथ चौधरी, दीपक पाटील, बंटी पाटील, विजू पाटील, तलाठी संदीप चव्हाण, तलाठी ज्योती चिंचोले, पंडित पाटील, अतुल पाटील,आर.के.पाटील, सुनील पाटील, गजानन पाटील, सुनील काटे यांचेसह कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.