औरंगाबाद जिल्हासामाजिकसोयगाव तालुका

सोयगाव: निमखेडी-उमरविहीरे पाणीटंचाईने होरपळले,ग्रामसेवकाचे दुर्लक्ष;ग्रामस्थांचा आरोप

सोयगाव दि.११(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): सोयगावपासून जवळच असलेल्या व औरंगाबाद लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या पहिल्याच निमखेडी-उमर्विहीरे या गावांना दोन महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून या गावातील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी होरपळली असतांना प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.या ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सोयगाव शहरापासून जवळच असलेल्या आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या सोयगाव तालुक्यातील पहिल्याच गावात तीव्र पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना महिनाभरापासून बसत असतांना याकडे दुर्लक्ष झाले आहे.

दरम्यान निमखेडी-उमरविहीरे हे गाव सोयगाव पासून जवळ आणि जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव(हरे)गावाला लागुनच असल्याने येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पाचोरा तालुक्यात जावे लागत आहे.परंतु पाचोरा तालुक्यातही तीव्र पाणीटंचाई असल्याने येथील ग्रामस्थांची घशाची कोरड वाढली आहे.दरम्यान या गावाला पाच वर्षापासून राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणी पुरवठा मंजूर आहे.परंतु पुरवठा विहिरीसाठी जागाच नसल्याने येथील ग्रामपंचायतीने पाचोरा तालुक्यातील धाकलेश्वर धरणात योजनेची पुरवठा विहीर खोदकाम करण्याचे काम हाती घेतले होते,परंतु जळगाव पाटबंधारे विभागाने पाचोरा तालुक्यालाही गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे भाकीत करून औरंगाबाद पाटबंधारे विभागाला पत्र देवून सदर धाकलेश्वर धरणातील पाणी केवळ पाचोरा तालुक्यासाठी नागरिकांच्या पिण्यासाठी राखीव असल्याचे कारण देत विहिरीचे काम बंद पाडले,परंतु पाचोरा जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे आणि सोयगावचं जिल्हा परिषद सदस्य पुष्पा काळे यांच्या समन्वयाने औरंगाबाद पाटबंधारे विभागाने पुन्हा पाठपुरावा करून विहिरीची परवानगी आणली,परंतु दुर्दैवाने या धरणातील विहिरीला पाणीसाठाच न आल्याने हा प्रयोग अयशस्वी झाला असल्याने दोन्ही गावांच्या नशिबी पाणी टंचाईची झळ बसली आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.