जरंडी दि.१२(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):जरंडी ता.सोयगाव येथे सालाबादप्रमाणे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शनिवारी दि.१३ पासून अखंड हरीनाम व कीर्तन सप्ताहचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बालाजी संस्थानचं वतीने देण्यात आली आहे.
जरंडी गावात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी अखंड हरीनाम,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व काकड आरतीचे आयोजन करण्यात येते,दरम्यान शनिवारी दि.१३ श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन ह.भ.प शरद महाराज सोयगाव यांच्या कीर्तनाने प्रारंभ करण्यात येईल,ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन ह.भ.प नरेंद्र महाराज करणार आहे.दरम्यान कीर्तन सप्ताहात ह.भ.प प्रभाकर महाराज पाटील बुलढाणा,सुनील महाराज कोळी,कर्की ता.मुक्ताईनगर,भागवत महाराज गहुखेडा ता,रावेर,सुशांत महाराज पालफाटा फुलंब्री,गोरक्षनाथ महाराज,काकडे वाघलगाव,रमेश महाराज सुसरी,आदींच्या कीर्तनाने सप्ताह संपन्न होणार आहे.
हनुमान जयंतीनिमित्त रवींद्र महाराज परेरव यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.यासाठी ग्रामस्थ व बालाजी भजनी मंडळ पुढाकार घेत आहे.