जरंडी दि.१६(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):जरंडीसह परिसरात मंगळवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली,त्यामुळे रात्री जनजीवन विस्कळीत झाले होते,दरम्यान मंगळवारी सकाळी झालेल्या पावसाच्या तुरळक सरीनंतर दुपारी अचानक पडलेले कडाक्याचे उन आणि त्यानंतर सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे.
दिवसभरात तीनवेळा बदलते वातावरण याचा मंगळवारी जरंडी परिसरातील नागरिकांना आगळावेगळा अनुभव आला.दरम्यान रात्री झालेल्या दमदार पावसात ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत झाले होते.अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधा उडाली होती.जरंडी,निंबायती,बहुलखेडा,रामपुरा,माळेगाव,पिंपरी आदि भागात पावसाचा शिडकावा झाल्याने गारवा निर्माण झाला होता.