वैजापूर (प्रतिनिधी): बेकायदेशिररित्या विना परवाना दोन ब्रास वाळूची चोरटी वाहतूक करणारा मॅटाडोर टॅम्पो व दोन ब्रास वाळू किंमत ३१०००० आज पहाटे ४ वाजेच्यादरम्यान विरगाव पोलीसांनी पकडला.
याबाबत सविस्तर माहीती अशी कि विरगाव ठाणेचे पोलीस कर्मचारी मोटार सायकलवर विरगांव ते वाजरगांव या रत्यावर पेट्रोलींग करीत असताना वाजरगांव ते कापुसवाडगांव शिवारात मॅटाडोर चालकाने मालकाच्या सागण्यावरुन विनापरवाना बेकायदेशीरीत्या चोरुन मॅटाडोरमध्ये चोरटी वाळू वाहतुक करताना आरोपी अशोक लहीरे व सतीष शिंदे यानी मोटारसायकलवर येवून पोलीस नाईक संतोष सोनवणे याना तुम्ही माझी गाडी अशी नेता तुझ्याकडे बघतो तुझ्याविरुध्द एस पी मॅडमकडे तक्रार करतो असे म्हणत हुज्जत घालीत सरकारी कामात आडथळा करीत धक्का देवून मोटारसायकलवर निघुन गेले म्हणून विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.