अकोट:मुंडगाव येथून अकोट जाण्यासाठी जवळचा मार्ग लोहारी मार्गावरील वळण रस्त्याच्या कडेला काटेरी झुडूपांचे वाढ झाली आहे. यामुळे समोरून येणारया वाहणाचा अंदाज न येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे ही झाडे तोडण्याची मागणी वाहनधारकांनी व ग्रामस्थांनी केली आहे. मुंडगाव वरून अकोट ला हा जवळचा मार्ग आहे.यामुळे या मार्गावर मोठी वर्दळ सुरु असते. येथूनच सिरसोली, बेलखेड, अकोली रूपराव, नेव्हरी, जळगाव नहाटे,जाण्याचा कणी अंतराचा मार्ग असल्याने अनेक वाहनधारक येथूनच जाणे पसंत करतात, या मार्गावर वळण रस्त्यावर अनेक दिवसांपासून काटेरी झुडूपांची वाढ झाली आहे. वाहन चालवताना पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने अनेकदा वाहन चालकांची फसगत होते.तसेच अनेक जड वाहने या मार्गावर जात असतात.रात्रीच्या वेळी ही झुडूपे न दिसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारत येत नाही. रस्त्या वद॔ळीचा असल्यामुळे तसेच या परिसरातील शैक्षणिक महाविद्यालयिन विद्यार्थी नेहमी या रस्त्याने ये जा करीत असतात.सध्या अवकाळी पाऊस तसेच वादळी वारयामुळे रस्त्या लगत असणारया धोकादायक झाडे व झुडूपामुळे वाहतुकीसाठी अडथळा होत आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकारयांनी लक्ष देऊन काटेरी झुडूपे तोडण्याची मागणी वाहनधारक व ग्रामस्थ करत आहे.
0