प्रशासकीय

स्पर्धेच्या युगात वृत्तपत्रांचे स्थान आजही अबाधित – माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 1 : स्पर्धेच्या युगात वृत्तपत्रांचे स्थान आजही अबाधित असल्याचे मत माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंडिया ग्राऊंड रिपोर्ट (आयजीआर) प्रकाशनाच्या माध्यमातून दै. दो बजे दोपहर या वृत्तपत्राचे पुन:प्रकाशन आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आलेयावेळी त्या बोलत होत्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेविधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेआमदार महादेव जानकरमाजी आमदार भाई जगतापमाजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंहदै. दो बजे दोपहर चे संपादक अरुण लालसह संपादक राजा अदाते उपस्थित होते.

राज्यमंत्री मंडळातील तरुण महिला सदस्य तसेच पालकमंत्री म्हणून केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले व उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार व सन्मानपत्र देऊन राज्यमंत्री कु. तटकरे यांना सन्मानित करण्यात आले.

राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना नियमित वृत्तपत्र वाचनाची चांगली सवय जडली. पत्रकारितेच्या कार्यकक्षा बदलत असताना प्रिंट मिडीया प्रमाणेच सोशल मीडियाई-न्यूज या माध्यमातून राजकीयसामाजिक व सांस्कृतिक घडमोडींची माहिती दिवसभरात स्मार्टफोनच्या माध्यमातून पहायला मिळते. तरीही माझ्यासारख्या अनेकांना सकाळच्या चहासोबत वृत्तपत्र हाती असावे, असे नेहमी वाटते. वृत्तपत्रासाठी चिकाटीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हे सर्व उपलब्ध होते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या माध्यमातून होणाऱ्या जबाबदारीपूर्ण लिखाणातून आम्ही बऱ्याच नवीन गोष्टी शिकत असतो, असेही दै. दो बजे दोपहर या वृत्तपत्रास शुभेच्छा देताना राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या.

राजकारणाचा वारसा लाभला असला तरी विधिमंडळाची पहिली पायरी चढताना एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या पदकर्तव्य व जबाबदारीची भावना अधिक प्रकर्षाने जाणवते. क्षेत्र कोणतेही असो आपल्या कर्तव्याची जबाबदारीचिकाटी व यासारख्या सन्मानपूर्ण प्रोत्साहान सोहळ्यातून मिळणारी ऊर्जा मोठी भरारी घेण्यासाठी उपयुक्त ठरते. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजकीय क्षेत्रातील कार्यासाठी हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी भाग्याचा क्षण असल्याची भावना मंत्री कु. तटकरे यांनी बोलून दाखवली.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button