प्रशासकीयब्रेकिंग न्युज

अ‍ॅथलेटिक्स, जलतरणात पाच सुवर्णपदके; खो-खो, टेनिसमध्ये महाराष्ट्राची आगेकूच

आठवडा विशेष टीम―

पंचकुला, ९ (क्रीडा प्रतिनिधी) : खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा आजही पदकांची मालिका सुरूच आहे. अॅथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य पदक मिळाले. जलतरणात दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदके आली. खो-खोमध्ये मुला-मुलींच्या संघांनी विजयी सलामी देत आगेकूच केली. टेबल टेनिसमध्ये सायली राजेश वाणी व प्रिथा प्रिया वर्तीकर यांनी विजय मिळवले.

जलतरणमध्ये ४०० मीटर फ्रीस्टाईल – आन्या वाला (मुंबई) हिने सुवर्ण, १०० मीटर बटरफ्लाय – अपेक्षा फर्नांडीस हिनेही सुवर्ण पदक जिंकले. १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पुण्याच्या उत्कर्ष गौर व १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये मुंबईच्या पलक जोशीने कांस्य पदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या पदकतालिकेत आज एकंदर पाच सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य पदकांची भर पडली. वेटलिफ्टिंगमध्ये मुलांच्या संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. मुलींच्या ४ बाय ४०० रिलेच्या संघाने विजेतेपदक उंचावले.

२०० मीटर धावण्यात सातारच्या सुदेष्णा शिवणकरने आजही सुवर्ण कामगिरी केली. अवंतिका नरळे हिला याच प्रकारात रौप्यपदक मिळाले. मुलांमध्ये आर्यन कदम (पुणे) याने २०० मीटरमध्ये सुवर्ण पदक उंचावले.

मुलींच्या रिलेच्या विजेत्या संघात रिया पाटील (कोल्हापूर), वैष्णवी कातुरे (नाशिक), प्रांजली पाटील (मुंबई), शिवेच्छा पाटील (पुणे) यांचा समावेश होता. त्यांच्या संघाने सुवर्ण जिंकले. उद्या मल्लखांबमध्ये सांघिक आणि वैयक्तिक पदके मिळण्याची आशा आहे.

पदकतालिका

हरियाना  – ३३ सुवर्ण, २७ रौप्य, ३६ कांस्य (एकूण ९६)

महाराष्ट्र – ३० सुवर्ण,  २८ रौप्य, २५ कांस्य (एकूण ८३)

मणिपूर – १३ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य (एकूण १८)

(ही आकडेवारी सायंकाळी साते वाजेर्यंतची आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button