परळी तालुकाबीड जिल्हा

सामत परिवाराकडून तहानलेल्यांना पाणी ; कै.अशोकसेठ सामत यांच्या स्मरणार्थ टँकरचे लोकार्पण

परळी:सध्या सर्वत्र भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परळीकरांनाही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असून, वाण धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. भुजल पातळी खालावली असून, अनेक नैसर्गिक स्त्रोत अटले आहेत. या पार्श्वभूमीवर कै.अशोकसेठ सामत यांच्या स्मरणार्थ परळीकरांना मोफत पाणी देण्याचा निर्णय घेतला असून, नुकतेच पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचे लोकार्पण करण्यात आले आहे. सामत परिवार हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. परळीकरांच्या अडीअडचणीला नेहमीच सहकार्य व मदत करणारे सामत परिवार आहे. यावर्षी भयंकर दुष्काळ जाणवत असल्यामुळे पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून परळीकरांच्या मदतीसाठी सामत परिवाराच्या वतीने कै.अशोकसेठ सामत यांच्या स्मरणार्थ मोफतटॅंकर पाणीपुरवठा सुरु केला आहे. याचा नुकताच लोकार्पण झाले.
कै.अशोकसेठ सामत यांचा दि.2 मे रोजी गोडजेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या निमित्त परळीकरांना पाणीटंचाईला तोंडदेण्यासाठी सामत परिवार व मित्रपरिवाराच्या वतीने मोफत टॅंकर पाणीपुरवठा ह.भ.प.केशव महाराज उखळीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विजय सामत, प्रकाशसेठ सामत, माजलगांवचे आ.आर.टी.देशमुख, भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड, भाजपाचे युवानेते राजेश गित्ते, वैद्यनाथ बॅंकेचे व्हा.चेअरमन विनोद सामत, रुपेश सामत, संदीप लाहोटी, धरमचंद बडेरा, अॅड.अतुल तांदळे, श्रीहरी मुंडे, विठ्ठलअप्पा चौधरी, प्रसिद्ध व्यापारी विजयकुमार वाकेकर, संजय कापसे यांच्यासह आदी उपस्थित होते. परळी शहरातील नागरीकांना टँकर हवे असल्यास त्यांनी 9422244938, 9822306064, 9922441971, 8975769957 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन सामत परिवाराच्या करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button