परळी वैजनाथ (प्रतिनिधी):पंतप्रधान आवास योजने अंतर्गत परळी शहरासाठी 1357 घरकुलांना मंजुर मिळाली असुन सहा महिन्यापुर्वी शहरात करण्यात आलेल्या सर्व्हे मधुन ही मंजुर मिळाली असुन यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नाने या घरकुलांना मंजुरी मिळाली असुन प्रभाग निहाय मंजुरी मध्ये प्रभाग क्र.5 मध्ये सर्वाधिक 304 तेर त्या खालोखाल प्रभाग क्र.1 मधील नागरिकांना 109 घरकुलांची मंजुरी मिळाली आहे.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 6 महिन्यापुर्वी ए.एफ.सी. इंडिया लि.मुंबई या कंपनीने पात्र लाभार्थ्यांचा सर्व्हे करुन 1423 घरकुलांचा पात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी 558 घरकुलांना तर नवनिर्माण महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या 4000 पेक्षा अधिक नागरिकांच्या सर्व्हे मधुन 799 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. या योजनेत मंजुर झालेल्या प्रत्येक लाभार्थ्यांस आडीच लाख रुपये घरकुलासाठी अनुदान मिळणार आहे. हे अनुदान तीन टप्पयांत वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेतील घरकुलांच्या माध्यमातुन परळीशहरात 33 कोटी 92 लाख 50 हजार रु. वितरीत होणार आहेत. 1357 घरकुला पैकी प्रभाग क्र. 5 मध्ये 304 तर प्रभाग क्र. 1 मध्ये 109 घरकुलांचा समावेश आहे.
पात्र नागरिकांनी सतर्कता बाळगावी-गोपाळ आंधळे
पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातुन परळी शहरात मंजुर झालेल्या घरकुला पैकी सर्वाधिक घरकुल प्रभाग क्र.5 मध्ये मंजुर झाले असुन यात एकुण 304 घरकुलांच्या माध्यमातुन 7 कोटी 60 लाख रु.चा निधी प्रभागात उपलब्ध झाला आहे. घरकुल मंजुर झालेल्या नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता कांही तोतया एजंट मंजुर झाल्यानंतर पैशाची मागणी करतांना दिसत आहेत. या भुलथापांना घरातील महिला बळी पडत असल्याचे दिसत आहे. तरी नागरिकांनी सदरील घरकुलासाठी आवश्यक असणारी कागदांची पुर्तता व अधिक माहितीसाठी आपआपल्या प्रभागातील नगरसेवकांशी संपर्क साधावा किंवा नगर परिषद कार्यालय अधिकार्यांशी खातर जमा करावी असे आवाहन प्रभाग क्र.5 चे नगरसेवक तथा माजी सभापती गोपाळ आंधळे यांनी केले आहे.