टीम आठवडा विशेष|नवी दिल्ली –
कन्हैया कुमार विरोधात दाखल केलेलं आरोपपत्र पटियाला हाऊस काेर्टानं फेटाळलं आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी आरोपपत्र दाखल केलं होतं.
कन्हैया कुमार विरोधात आरोपपत्र दाखल करताना राज्य सरकारच्या कायदा विभागाची परवानगी का घेण्यात आली नाही, असा सवाल न्यायालयानं पोलिसांना विचारला आहे.
जेएनयुमध्ये कथित देशविरोधी घोषणा दिल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी देशद्रोहाच्या गुन्ह्यात कन्हैया कुमार सहित 10 जणांवर आरोपपत्र दाखल केलं होतं.दरम्यान, 9 फेब्रुवारी 2016 रोजी जेएनयुमध्ये कथित देशविरोधी घोषणा दिल्याचं प्रकरण घडलं होतं.
0