अंबाजोगाई: आठवडा विशेष टीम― येथील प्रा.माधव मोरे स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने शनिवार,दि.18 मे रोजी सायंकाळी 6 वाजता प्रा.माधव मोरे यांच्या 26 व्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यान व आदर्श कार्यकर्ता पुरस्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले.यावेळी गुणवंतांचा सत्कार ही करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रा.एस.के. जोगदंड यांनी दिली आहे.
विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृह अंबाजोगाई येथे शनिवार,दि.18 मे रोजी सायंकाळी 6 वाजता प्रा.माधव मोरे यांच्या 26 व्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यान व आदर्श कार्यकर्ता पुरस्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.अशोक मजमुले हे राहणार असून यावेळी व्याख्याते राम गारकर (सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी तथा बहुजन वंचित आघाडीचे लातूर लोकसभेचे उमेदवार) हे “देशातील वंचित समुहाच्या समकालीन राजकारणाची दिशा” या विषयावर आपले मौलिक विचार मांडणार आहेत.या प्रसंगी फुले-शाहु-आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते साहेबराव देवराव पोटभरे (नाकलगावकर) यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.तसेच यावेळी गुणवंतांचा सत्कार ही करण्यात येणार आहे.तरी अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांनी प्रा.माधव मोरे यांच्या 26 व्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान व आदर्श कार्यकर्ता पुरस्कार समारोहास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रा.माधव मोरे स्मृती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रा.एस. जोगदंड,उपाध्यक्ष प्रा.नानासाहेब गाठाळ, सचिव लंकेश वेडे, सहसचिव प्रा.गौतम गायकवाड,सुखदेव भुंबे,भगवानराव ढगे आदींसहीत सर्व सदस्यांनी केले आहे.