क्रीडा दिनानिमित्त क्रीडा मंत्री यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 28 : हॉकी खेळातील जादूगर म्हणून नावाजलेले मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन सर्व देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांच्या कार्यालयाच्यावतीने  क्रीडा व युवक कल्याण मंत्री  गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते मुंबई हॉकी स्टेडियम, चर्चगेट येथे सकाळी 9 वा. मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमेस वंदन करुन राष्ट्रीय क्रीडा दिनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर डॉन बॉस्को स्कूल, माटुंगा येथे सकाळी 10 वा. क्रीडा मंत्री यांच्या हस्ते मुंबई शहरातील नावाजलेले खेळाडू व मार्गदर्शक यांचा सत्कार होणार आहे. तसेच कबड्डी, फुटबॉल व हॉकी खेळांचे सामने सुरु होणार आहेत. या कार्यक्रमाकरीता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव, मुंबई विभागाचे क्रीडा युवक सेवा उपसंचालक यांची उपस्थिती असणार आहे.

0000000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.