आठवडा विशेष टीम― बाहेर देशात एमबीबीएस / बीएस-एमडी चे शिक्षण घेऊन आलेल्या भारतीय डॉक्टरांना जर भारत सरकारने विना अट प्रॅक्टिस करण्यास परवानगी दिली तर खरच भारतात असलेल्या आरोग्य विषय तुटवडाच्या समस्येवर मोठा परिणाम होऊन भारत हा देश आरोग्याच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर जाईल.
भारत सरकारने परदेशातुन वैद्यकीय शिक्षण घेऊन येणाऱ्या भारतीय विद्यार्थीवर्गाला एफएमजीई सारख्या परीक्षा ठेवल्या आहेत ज्यामुळे बरेच भारतीय डॉक्टर जे की आपला देश सोडून उच्चशिक्षणासाठी परदेशी गेले होते अश्या डॉक्टरांवर ह्या परीक्षेमुळे बेरोजगारीची समस्या उद्भवली आहे.त्यांनाही परवानगी दिल्यास मोठा फायदा होईल व त्यामुळे आरोग्य सेवा देखील भारतात सोयीस्कर रित्या मिळेल.
भारतातील बारावी झालेले विद्यार्थी फिलिपिन्स,रशिया,जर्मनी,अमेरिका,युक्रेन सारख्या देशात एमबीबीएस व एमडी चे शिक्षण घेण्यासाठी जातात त्यांना सर्व प्रकारच्या समस्याना सामोरे जात तेथून पदवी मिळवावि लागते आणि भारतात आल्यावर देखील प्रॅक्टिस साठी परीक्षा द्यावी लागते ही खूप मोठी गंभीर बाब आहे.
सरकारने जर ह्याचा विचार करून योग्य तो निर्णय घेतल्यास परदेशात शिक्षण घेऊन आलेल्या डॉक्टरांना भारतीय जनतेची चांगल्याप्रकारे आरोग्य सेवा करता येईल.