आठवडा विशेष टीम Updates:
गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुक २०१९चा निकाल आज जाहीर होत आहे.बीड लोकसभा च्या जागेवर डॉ प्रितम गोपीनाथ मुंडे १५००० मतांच्या आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.
अहमदनगरमध्ये पहिल्या फेरीनंतर १२ हजार मतांनी भाजपचे डॉ.सुजय विखे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना २९ हजार ६९४ मतं मिळाली असून संग्राम जगताप १७ हजार ३४८ मतं पडली आहेत
या लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यातील अनेक दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मतमोजणीला सुरवात होताच भाजप आघाडीवर होते. सत्ताधारी भाजप पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस २०१४ मधील आपल्या कामगिरीत सुधारणा करणार? हे आज मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.