बीड: परळी तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था ; कंत्राटदाराकडून बिले उचलण्याचा सपाटा

परळी वैजनाथ: परळी तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, आमदार फंड, खासदार फंड व इतर योजनांच्या माध्यमातुन अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम सुरु आहे. यातील बहुतांष रस्त्यांच्या कामांची मुदत संपली तरीही ही कामे अपुर्णच आहेत व जि कामे करण्यात आली आहेत. ती कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. राजकिय नेत्यांच्या समतीने कंत्राटदाराकडुन मात्र बिल उचलण्याचा सपाटा लावला आहे. भिषण दुष्काळाच्या परिस्थितीत ग्रामिण भागातील जनतेला पाण्याच्या समस्ये बरोबरच या रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
परळी तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन 33 रस्त्यांच्या कामासह विविध योजनांच्या माध्यमातुन मागील वर्षभरापासुन अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. शुभारंभाचा सपाटा लावल्यानंतर या रस्त्याकांमाची गती अतिषय संथ आहे. परळी-मलकापूर-मांडवा या 5 कोटीच्या रस्त्याची पुर्वीच्या रस्त्यापेक्षा अवस्था बिकट झाली आहे. सदरील कंत्राटदाराने अंदाज पत्रकात नमुद केलेल्या रुंदीपेक्षा कमी रुंदीचा रस्ता केला आहे. साईड पट्टया अद्याप केलेल्या नाहीत. विशेष म्हणजे हाच रस्ता सहा महिन्यापुर्वी करण्यात आला होता. अवघ्या कांही महिन्याच्या अंतराने एकाच रस्त्यावर एवढा मोठा निधी खर्च केला जात आहे. आणि तरीही रस्ता निकृष्ट दर्जाचा केला जात आहे. या रस्ता मुदत संपली तरीही रस्त्याचे काम अपुर्णच आहे. बिल मात्र अधिकार्‍यांच्या संमतीने उचलल्या जात आहे. याबरोबरच परळी-मालेवाडी-वनवसवाडी-हेळंब या रस्त्यावर केवळ पहिलाच थर देण्यात आला हॉटमिक्सचे अंदाजपत्रकात असतांना रस्त्यावर मात्र बारीक खडी टाकुन निकृष्ट पणा झाकण्याचा प्रयत्न केला आहे. टोकवाडी ते नागापुर, मांडखेल ते वानटाकळी, डाबी ते डाबी तांडा, कावळेवाडी फाटा ते भिलेगाव, बीड रोड ते परचुंडी, चांदापुर ते घाटनांदुर, परळी-नंदागौळ-पुस, खोडवा सावरगाव-दैठणा-गुट्टेवाडी मार्गे धर्मापुरी या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असतांना या रस्ता कामाकडे सां.बा.विभागाच्या अभियंत्याचे दुर्लक्ष होत असुन प्रत्यक्ष कामांवर पाहणी न करताच बिले दिले जात असल्याने हा सर्व बिना बोभट कारभार सुरु आहे. तालुक्यातील जनतेच्या समस्यांची कुठलीही जाण व काळजी या अधिकार्‍यांना राहिलेली नाही. पदभार परळीचा असतांना लातुर, अंबाजोगाई येथुन कारभार सुरु असल्याने दुष्काळाच्या भिषण संकटा बरोबरच जनतेला रस्त्याचे संकट सहन करावे लागत आहे. रस्त्याकामांच्या शुभारंभ वेळी परळीतील लोक प्रतिनिधींनी दर्जेदार रस्त्यांचे आश्‍वासन दिले होते. परंतु सध्या हेच लोक प्रतिनिधी या विषयावर बोलणे टाळत आहेत. त्यामुळे परळी तालुक्यातील ग्रामिण भागातील जनतेला कुणीच वाली उरलेला नाही.

परळी तालुक्यातील रस्ता कामांमध्ये 25 कोटींचा अपहार-वसंत मुंडे

परळी तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, आमदार फंड, खासदार फंडातुन कोट्यावधी रुपयांची कामे सुरु आहेत. याकामावर कोणाचे नियंत्रण नसल्याने मोठा भ्रष्टाचार होत आहे. दर्जेदार कामे करण्याचा दावा करणार्‍या जिल्ह्याच्या पालकमंत्री या रस्ता कामाबाबत अनभिंज्ञ असल्याने 25 कोटी रुपयांचा अपहार झाला असुन हा अपहार करणार्‍या कंत्राटदार, सां.बा.विभागाचे अधिकरी यांची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा श्रम व रोजगार विभागाचे चेअरमन वसंत मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालय मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.