अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― भारताचा इतिहास हा उज्ज्वल आणि दैदिप्यमान आहे.या इतिहासात पुरूषांच्या बरोबरीनेच कर्तबगारी करत अनेक स्त्रियांनी आपली नांवे इतिहासात सुपर्णपानावर रेखाटली आहेत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राष्ट्र निर्माण, समाज बांधणी,विविध कलांना प्रोत्साहन, साहित्य,संगीत व संस्कृती संवर्धनाचे केलेले कार्य हे पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन व्याख्याते चंद्रकांत हजारे यांनी केले.
मोरफळी (ता.धारूर) येथे मंगळवार,दि.28 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून चंद्रकांत हजारे (अंबाजोगाई) यांनी प्रबोधनपर व्याख्यान दिले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अॅड.मनिषा गडदे, हनुमंत गडदे,रामचंद्र नरूटे,गोपाळ गडदे, बाळासाहेब गायके, वैजेनाथ गडदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना व्याख्याते चंद्रकांत हजारे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याची माहिती उपस्थितांना दिली.यावेळी त्यांनी भारतीय इतिहासातील विविध दाखले दिले. महाराष्ट्रात अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी माणून नवी पिढी समाजक्षेत्रात काम करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.भारतीय इतिहासातील कर्तबगार व सामर्थ्यवान महीला प्रशासकांमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा समावेश असल्याचे चंद्रकांत हजारे म्हणाले. कार्यक्रमाचे सुञसंचालन करून उपस्थितांचे आभार नवनाथ गडदे यांनी मानले.प्रारंभी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोरफळी येथील जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व समस्त ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.