अंबाजोगाई: शोषित,पिडीत व उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी शासन व प्रशासन,प्रस्थापितांच्या विरोधात बंड करून सर्व सामान्य व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य झिजवणारे कर्मवीर अॅड. एकनाथरावजी आवाड (जिजा) यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्रात उपेक्षित माणसांच्या न्याय हक्कासाठी काम करणार्या कार्यकर्त्याला प्रेरणा मिळावी.यासाठी युवा प्रतिष्ठाण अंबाजोगाईच्या वतीने समाजात प्रबोधन करणारे,धम्म चळवळ गतीमान करून योगदान देणारांना हा पुरस्कार दिला जातो.पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. कर्मवीर अॅड. एकनाथराव आवाड राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्कार-2019 चे वितरण व मान्यवरांचे व्याख्यान रविवार,दि.2 जून रोजी आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब क्षीरसागर (कार्याध्यक्ष,मानवी हक्क अभियान) तर प्रमुख पाहुणे म्हणून मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.मिलींद आवाड यांची उपस्थिती लाभणार आहे.यावेळी अविनाश बर्वे यांना ‘राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्कार – 2019′ देवून सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी सत्यशोधक समाज महासंघ, महाराष्ट्राचे अध्यक्ष डी.एस.नरसिंगे, रामदादा किरवले (जिल्हाध्यक्ष पी.डी.पी.),राहुल शिंदे (जि.उ.लालसेना), सुनिताताई नरंगलकर (सामाजिक कार्यकर्त्या) हे मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.परळी वै.येथे रविवार,दि.2 जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्व पुरोगामी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व आयोजक अशोक पालके,लालासाहेब लोंढे,सत्यभामा सौंदरमल,रेखा सरवदे, सुवर्णा मिसाळ,धर्मराज मिसाळ,विक्रम मिसाळ, धिमंत राष्ट्रपाल,परमेश्वर आडागळे,दत्ता उपाडे, बंडु ताटे,मारूती मस्के, जालिंदर कसाब,दशरथ कांबळे,हणुमंत गायकवाड,कमलाकर मिसाळ,राम जोगदंड, दिलीप पालके,भारत क्षीरसागर,गणेश लांडगे अरविंद मिसाळ,वसंत उदार,बबन कसबे, जितेंद्र मस्के,लक्ष्मण साळवे,किरण सगट, नारायण डावरे आदींनी केले आहे.