जालना जिल्हा

सामनगावातून काजळा शिवारातील स्थलांतरित पत्त्याच्या क्लबवर पुन्हा धाड; 9 लाखाचा मुद्देमाल जप्त

एलसीबीच्या पथकाची पिकअपने जाऊन धडक कारवाई; 8 जण जेरबंद

जालना,(नारायण माने):तिन महिन्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधिक्षकाच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करुन, सामनगांव येथील रामेश्वर खैरेचा हायटेक पत्याचा क्लब बंद केला होता. मात्र, पुन्हा रामेश्वर खैरेने हा पत्याचा क्लब काजळा शिवारातील डाळींबाच्या बागेत स्थलांतरी करुन सुरु केला होता.

या पत्त्याच्या क्लबवर आज बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकुन रामेश्वर खैरे व शेतमालक अशा आठ जणांना रंगेहाथ पकडले आहे. यावेळी महागड्या स्कॉर्पिओसह मोटारसायकली, महागडे मोबाईल व रोख रक्कम असा 9 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत या क्लबवर कारवाई सुरु होती.

याबाबत माहिती अशी की, 10 मार्च 2019 रोजीच्या रात्री सामनगांव शिवारात सुरु असलेल्या पत्त्त्याच्या हायटेक जुगार अड्‌ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन 14 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहने जप्त करण्यात आली होती. या कारवाईमध्ये त्यावेळी स्वत: पोलीस अधिक्षक एस.चैतन्य सहभागी झाले होते. दरम्यान हा पत्त्याचा क्लब पुन्हा काजळा शिवारातील गट नं. 35 मधील एका शेतकऱ्याच्या डाळींबाच्या बागेत सुरु झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरिक्षक गौर यांनी 15 कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करुन एका पिकअप टेम्पोमध्ये बसून जावून बुधवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास काजळा शिवारातील गोपाल नारायण खांडेकर या शेतकऱ्याच्या शेतावर धाड टाकली. यावेळी जुगार खेळतांना आठ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी पत्त्याच्या क्लबचा मुख्य सुत्रधार रामेश्वर विठ्ठलराव खैरे (रा. सामनगांव), शेतमालक गोपाल नारायण खांडेकर (रा. काजळा), राजेंद्र सखाराम चव्हाण (रा. नुतन वसाहत जालना ) , प्रल्हाद प्रभाकर भुतेकर (रा. माळीपिंपळगाव), रंगनाथ बाबुराव वासुंबे (रा.देऊळगांवराजा), संदीप गणपतअप्पा निस्ताने (रा. इंदेवाडी), बळीराम प्रभाकर नेमाने (रा.सामनगांव), बाबासाहेब जगनाथ बकाल (रा. कारला) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे.
यावेळी पोलीसांनी 5 लाख रुपये किंमतीची एक स्कार्पिओ, दिड लाखाची एक बुलेट, दिड लाख रुपये किंमतीच्या मोटारसायकली, 75 हजाराचे 9 मोबाईल्स आणि रोख 45 हजार 190 रुपये असा एकुण 9 लाख 20 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या काजळा येथे कारवाई सुरु असून, यासंदर्भात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस उपनिरिक्षक जयसिंग परदेशी, सहाय्यक फौजदार शेख रज्जाक, पोलीस कर्मचारी कैलास कुरेवाड, प्रशांद देशमुख, रंजित वैराळ, किरण मोरे, सचिन चौधरी, कृष्णा तंगे, सोमनाथ उबाळे, लखन पचलोरे, किशोर जाधव, हिरामण फलटणकर, राहुल काकरवाल, परमेश्वर धुमाळ, पुनम भट, आशा जायभाये यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button