आंतरराष्ट्रीयब्रेकिंग न्युज

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानात अटक

आठवडा विशेष टीम―लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबई २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. हाफिज सईद लाहोरहून गुजरांवाला येथे जात असताना दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली असल्याचे समजते. हाफिजला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी पंजाब प्रांतातील पोलिसांनी हाफिज सईद विरोधात दहशतवादाला पैसा पुरवणे आणि आर्थिक गैरव्यवहार या आरोपांखाली एफआयआर दाखल केला गेला होता. त्याचवेळी त्याला अटक होणार होती अशी चर्चा होती. हाफिजने फक्त मुंबईवरच नव्हे तर देशाच्या वेगवेगळया भागात दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत.

दहशतवादी कायद्याखाली पाकिस्तानने २०१७ साली हाफिझ सईद आणि त्याच्या ४ सहकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. पण ११ महिन्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

एएनआय या वृत्तसंस्थेने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केले आहे. पाकिस्तानमधील लाहोर येथून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या दबाव तंत्राला मोठं यश आल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तानने हाफिज सईदच्या अटकेवरून जगाची फसवणूक करत आहे, पाकिस्तान कोर्टात पुरावे कसे सादर करते आणि त्याला दोषी ठरवण्यासाठी काय करते हे आपल्याला पहावे लागेल अन्यथा हे नाटक असल्याचे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button