आठवडा विशेष | प्रतिनिधी
अंबड: राजपूत भामटा जात प्रमाणपत्र वितरण सोहळा दिनांक 21 जानेवारी 2019 वार सोमवार आज सकाळी 12:00 वाजता अतिशय आनंदात पार पडला स्थळ कौचलवाडी पोस्ट रोहिलागड तालुका अंबड जिल्हा जालना, जालना जिल्ह्यातील कौचलवाडी मध्ये पहिल्यांदाच राजपूत समाजाचे खूप मोठे कार्य आज दिग्गज मान्यवरांच्या हस्ते अतिशय उत्सवात पार पडला सर्व राजपूत बांधव ह्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने हजर होते त्या सर्व राजपूत बांधवांना कौचलवाडी च्या वतीने व सर्व राजपूत बांधवांच्या वतीने आभार मानण्यात येते या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार रावसाहेब पाटील दानवे कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री आमदार नारायण भाऊ कुचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. भगवानसिंग डोभाळ ,माननीय श्री तोताराम बहुरे ,माननीय श्री प्रतापसिंग राजपूत , माननीय श्री राजूसिंग गुसिंगे ठेकेदार ,माननीय श्री सुभाष महेर सर,माननीय श्री ताराचंद जारवाल, माननीय श्री सुप्पड़सिंग जगरवाल,माननीय श्री भागवत बिघोत असे अनेक दिग्गज राजपूत बांधव ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते आजच्या कार्यक्रमांमध्ये कौचलवाडी, निहालसिंगवाडी, किनगाववाडी, कर्जत , नांदी , भोकरवाडी, खेडगाव असे अनेक गावाचे जात प्रमाणपत्र एकूण 251 वाटप करण्यात आले असेच कार्यक्रम सर्व राजपूत समाजाच्या गावांमध्ये घेण्यात यावे असे सर्व राजपूत बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. भगवानसिंग डोभाळ सर सूत्रसंचालन माननीय श्री सुभाष महेर सर आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य राजेश राजपूत यांनी केले