दमदार सरपंच पांडुरंग नागरगोजेंची शानदार कामगिरी ; रोहतवाडीतील रस्त्यांसाठी आणले कोट्यावधी रुपये

पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या रोहतवाडी गावामध्ये पांडुरंग नागरगोजे सरपंच झाल्या पासुन विकास कामाचा धुमधडाकाच चालू झाला आहे.रोहतवाडीचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता आमदार फंडातुन डांबरीकरणासाठी २५ लक्ष रुपये आणून पुर्ण केले तसेच रोहतवाडी जलयुक्त शिवार मध्ये फुटलेले पा.ट २५ लक्ष रुपये आणून दुरुस्ती केले. वाडीतील मुले शिकले पाहिजे म्हणून जि.प.प्रा.शाळा व्यवस्थित केली. महिलांना पाणी भरण्यासाठी हातपंप बसवले. गावाची शान ग्रामपंचायत ईमारतीत असती म्हणून रोहतवाडीत ग्रामपंचायत भवन उभारले. गावातील लोकांना रोजगार मिळावा म्हणून रोपवन रस्ता दुथर्पी लागवड सुरु केले.गावाला पाणीसाठा रहावा म्हणून पाझर तलाव दुरुस्ती व उंची वाढवली तसेच साठवण तलावासाठी १५ कोटी रुपये आणले असुन स्मशानभुमीसाठी ५ लक्ष रुपये खर्च करुण सुंदर बनवली. गावात घरा-घरात पाणी मिळावे म्हणून १.५ लक्ष रुपये खर्च करुन पाईप लाईन दुरुस्थ केली. रोहतवाडी गाव हागणदारी मुक्त केले. आपल्या गावातील युवक निरोगी राहावा,तो सैन्य भरती मध्ये फिट राहावा म्हणून व्यायामशाळेला मंजुरी आणली. तसेच आपल्या गावातील मुले खेळात ही पुढे राहावीत म्हणून क्रिडांगण मंजुर केले.गावातील शेतकऱ्यांना जलसिंचन विहीरी मंजुर केल्या. तसेच गावातील जनतेला शुध्द पाणी प्यायला मिळावे म्हणून खासदार प्रितमताई मुंडे व आमदार भिमराव धोंडे यांच्या हास्ते आर-ओ प्लॅन्टचा लोकार्पन सोहळा करुन रोहतवाडी गावामध्ये शुद्ध पाणी दिले असुन अनेक कामे मंजुरीच्या प्रगतीपथावर असल्यामुळे रोहतवाडी ग्रामपंचायतचा विकास करणारे सरपंच पांडुरंग नागरगोजे यांच्या प्रयत्नामुळे गाव शानदार झाले असल्याची चर्चा पंचक्रोशीत पाहायला मिळत आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.