सोयगाव:आठवडा विशेष टीम― सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गावरील कवली ता.सोयगाव गावाजवळील अर्धवट नळकांडी पुलाचा वळण रस्ताच दोन दिवसापूर्वी पुरात वाहून गेला होता.दरम्यान या रस्त्यावरून रात्री जाणारा हायवा ट्रक फसल्याने या रस्त्याची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती.त्यामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.दरम्यान तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर ग्रामस्थांच्या मदतीने हा फसलेला हायवा काढण्यात आला आहे.
सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गावर कवली गावाजवळील नळकांडी पुलाचे दहा वर्षापासून अर्धवट काम आहे.त्यामुळे या रस्त्यावर अनेकदा वाहतुकीची कोंडी झाली असतांना शुक्रवारी आलेल्या पुरात या अर्धवट पुलाजवळील वळण रस्ता वाहून गेलेला होता.या रस्त्यावरून शनिवारी रात्री पाचोऱ्याकडे जाणारा हायवा फसल्याने रविवारी पहाटेपासून या रस्त्यावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.दरम्यान नळकांडी पुलाजवळून काढण्यात आलेला वळण रस्ताही धोक्याचा झालेंल असतांना हा रस्ता अचानक आलेल्या पुरात वाहून गेला होता.हायवा चालकाला वाहून गेलेला रस्ताच दिसला नसल्याने त्याचा ट्रक शनिवारी रात्रीपासून गाळात फसला होता.रात्री या ट्रक चालकाला मदतकार्य न मिळाल्याने रात्रभर मुक्काम ठोकावा लागला होता.रविवारी पहाटेपासून बनोटी-चाळीसगाव-पाचोराकडून सोयगावकडे व सोयगावकडून चाळीसगावकडे जाणाऱ्या वाहनांची रीघ लागली होती.
0