परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणविशेष बातमी

बीड: पंकजाताई मुंडे यांची जोरदार शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी दाखल

कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघिण आली

ना. पंकजाताई मुंडे यांचा विजय असो, विविध घोषणांनी परिसर दुमदुमला!

परळी वैजनाथ दि.०३:आठवडा विशेष टीम―
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा विजय असो, पंकजाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कोण आली रे कोण आली महाराष्ट्राची वाघिण आली अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता. अशा मंगलमय, उत्साह आणि जल्लोषपुर्ण वातावरणात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत ना. पंकजाताई मुंडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अक्षरशः जणसागर लोटला होता. रॅलीने संपूर्ण शहर भाजपमय झाल्याचे चित्र दिसुन येत होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

भाजपा – शिवसेना – रिपाई – रासप – रयत क्रांती सेना महायुतीच्या परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी गुरूवारी शुभ मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी सकाळी ना. पंकजाताई मुंडे आपल्या यशश्री निवासस्थानातून बाहेर पडल्या आणि ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या जयघोषात त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यांनी थेट गणपती मंदिर, वैद्यनाथ मंदिर आणि नंतर गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

शिवाजी चौकात आगमन झाले. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना अभिवादन केले. यावेळी जोरदार घोषणांनी परिसर अगदी दणाणून गेला होता.या रॅलीत राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, भाजपाचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख

बाळ पंकू ” विजयीभव”

मुल कितीही मोठे झाले तरी आईसाठी ते बाळच असते त्याचा प्रत्यय आला. ना. पंकजाताई मुंडे उमेदवारी दाखल करण्यासाठी निघाल्या तेंव्हा त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले तेंव्हा त्यांनी “बाळ पंकू विजयीभव” असा आशिर्वाद दिला. यावेळी त्यांच्या भावना आवरता आल्या नाहीत. काही काळ सगळेच स्तब्ध झाले होते.

यावेळी खा.डॉ.प्रितम गोपीनाथ मुंडे, यशश्री मुंडे यांनी औक्षण करून पेढा भरवला. या प्रसंगी समवेत पंकजा मुंडे यांचे पती डॉ. अमित पालवे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचे पती गौरव खाडे, मंत्री महादेव जानकर असा पूर्ण परिवार होता.

आधी वंदू तुजमोरया!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाण्यापूर्वी उमेदवार ना. पंकजाताई मुंडे यांनी प्रथम दक्षिणमुखी गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर प्रभू वैद्यनाथाचा सपरिवार अभिषेक केला. यावेळी देवल कमिटीच्यावतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button