परळी:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे १३ व्या फेरीअखेर तब्बल २४२४६ मतांनी आघाडीवर आहेत.
परळी मतदारसंघातून भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे अशी लढत आहे.राज्यातील मुख्य लक्षवेधी मतदारसंघ असलेल्या परळी मतदारसंघातील या निकालाची उत्सुकता लागली असून कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.राजकीय जाणकरांच्या मते पुढील काही फेऱ्यांमध्ये चित्र बदलु शकते असे सांगण्यात येत आहे.