नाशिक:आठवडा विशेष टीम―नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकर्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई व संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी छावा क्रांतीवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने करत आहोत.नाशिक जिल्ह्यासह महाराष्टात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसत आहे. विजांच्या कडकडाटासह बरसणाऱ्या पावसाने आजपर्यंतचे दिवाळीतील रेकॉर्ड मोडले आहे. यामुळे खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान कोट्यवधी रूपयांच्या घरात आहे. यामध्ये द्राक्ष ,सोयाबीन ,मका, कापूस ,कडधान्ये आदी पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर, भेंडी, वांगे, कारले, वाल, दोडके आदी पिकांना मोठा फटका बसला आहे. भाजीपाला उत्पादन घटण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी, बागलाण, कळवण,मालेगाव, नांदगाव ,त्र्यंबकेश्वर, इगतपुरी,येवला,निफाड, सिन्नर, यासह जिल्हाभरात अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हजारो एकरावरील द्राक्षाचे पीक धोक्यात आले आहे.फुलोरा अवस्थेतील बागा संकटात सापडल्या आहे.नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागातील शेतात पाणी साचल्यामुळे शेतातील मका, बाजरी, सोयाबीन, कपाशी, कांदे, कांद्याचे, रोप, टोमॅटो,भुईमूग इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतात उभ्या असलेल्या पिकांसोबतच काढणीला आलेले पिकं वाया गेले आहे.दिवाळी सणाच्या कालावधीत पावसाने जोर धरल्यामुळे शेतातील तयार पिके काढता येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
सततच्या पावसामुळे शेतातील मका ,बाजरी ,ज्वारी आदी चारा सुद्धा सडून गेल्यामुळे चाऱ्याचा सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.मका सोयाबीन आदी पिकांना कोंब फुटले आहे.जिल्ह्यात कांदा पिकाचे सुद्धा नुकसान झाले आहे. कांद्याच्या रोपांसह शेतात लागवड केलेला कांदा सडू लागला आहे .इगतपुरी त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यात भात पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्टातील शेतकरी हवालदिल झाल्याने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा व नव्याने सरकार स्थापन होईल तेव्हा सरकारने प्रथम निर्णय घेऊन राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफी करावी अशी आग्रही मागणी आम्ही आपणाद्वारे करत आहे.कारण शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनातील गरजा ,मुलांचे शिक्षण ,आरोग्य ,आदी गरजा देखील भागवणे दुरापास्तच झाले आहे.
छत्रपती शिवरायांच्या नावाने शासन चालवण्यासाठी त्यांचे प्रत्यक्ष आचार विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी कृती करण्याची गरज असून फक्त शासकीय जाहिरातीत मोठं मोठ्या बाजार गप्पा छापून आमचा शेतकरी सुखी होणार नाही त्यासाठी ठोस भूमिका घेऊन तात्काळ दिलासा देऊन भविष्यात आकस्मित संकटांना सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्रातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरल्यावर काय होते ते आपण चागले जाणतात तरी देखील यावेळेला आम्हा शेतकऱ्यांना गृहीत धरू नये कारण प्रचंड रोष असून त्याचा कधीही भडका होईल याची खात्री नाही.
शासनाने आमच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन आम्हास दिलासा दायक उत्तर दिले नाही तर मोठ्या जनआंदोलनास शासन प्रशासनाने तैयार रहावे अशी नम्र विनंती छावा क्रांतीवीर विद्यार्थी सेनेच्या च्या वतीने प्रदेशाध्यक्ष उमेश शिंदे आपणांस याद्वारे जाहीर इशारा दिला आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी करण गायकर- संस्थापक अध्यक्ष ,शिवा तेलंग प्रदेश अध्यक्ष युवा ,प्रा उमेश शिंदे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शिवाजी मोरे प्रदेश महासचिव ,संतोष माळोदे प्रदेश उपाध्यक्ष ,विजय खर्जुल जिल्हा अध्यक्ष,निवृत्ती शिंदे ,गणेश दळवी युवक शहर अध्यक्ष सचिन जाधव निल वाघचौरे ,नवनाथ शिनगार ,आदीं प्रमुख उपस्थितीत होते.
1
नेहा सिंग दुल्हन तालुका बदनापुर जि जालना