येलावी:उत्तम जानकर―नुकत्याच झालेल्या विधानसभेला या समाजास 288 पैकी फक्त एक जागा मिलाली आणि लोकसभेला यासमाजास मागील सततर वर्षात एकही प्रतिनिधी निवडुन आणता आला नाही महाराष्टात लोकसंख्येने दोन नंबरला असणारा हा समाज फक्त राजकीय प्रगल्भता नसल्याने राजकीय दृष्टया मागास राहिला आहे आज पर्यंत पुरोगामी महाराष्ट आणि जातीयवादी पक्ष म्हणुन एकमेकांवर निवडणुकीत टिकेची झोड उटवायची आणि आप आपल्या सग्यासोयरयात देश्याची व राज्याची सत्ता वाटुन घ्यायची असा सपाटा याप्रस्थापित पक्षानी चालवल्याने आत्तापंर्यत हा समाज सत्तेपासुन कोसोदुर राहिलेला आहे राज्यातले असे पन्नासपेक्षा जास्त असे मतदार संघ आहेत कि फक्त धनगर समाजाने समाजाच्या प्रतिनिथीस मतदान केल्यास ते निवडुन येऊ शकतात व वीस ते तीस मतदार संघ असे आहेत कि तिथे धनगर समाजाचे चालीस ते पन्नास हजार मतदान आहे याठिकाणी इतर समाज्याच्या मदतीने उमेदवार निवडुन आणु शकतात तर पंथरा ते वीस मतदार संघामध्ये निर्णायक मतदान असल्याने कुणाचा कार्यक्रम करेक्कट करायचा ते ठरवु शकतात परंतु राजकीय प्रगल्भते अभावी समाजाची राजकीय पिछेहाट चालु आहे यासमाजातील काही नेत्यानी त्यासाठी जिवाचे रान करुन समाज एकसंघ करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानेत्यालाच अडचणीत आणुन त्याचे राजकीय भवितव्य धोक्यात आणन्याचा प्रयत्न झाल्याने नेत्यानी कालाची पावले ओलखुन वेगला पर्याय शोधणे पंसत केलेले दिसते , त्यामुले समाजाने नेत्याला नाव ठेऊन त्यांना अडचणीत आणन्यापेक्षा त्या त्या मतदार संघात समाजाची ताकद दाखविण्यी गरज आहे आज पर्यंत प्रत्येक प्रस्थापित पक्षाने यासमाजाचा वापर करून फेकुन देण्याचे काम केले आहे यांना फक्त ग्रामपंचायत पंचायत समिती जास्त आगाऊपणा करत असेल तर जिल्हा परिषद साखर कारखाना संचालक इथ परयंत च नेऊन ठेवायचा बदल्यात त्याच्या कडुन हजारो मतदान पिढ्यांनपिढ्या विधानसभेला व लोकसभेला घ्यायचा एक कलमी कार्यक्रम या प्रस्थापित पक्षांचा चालु आहे आणि या चाण्याक नितीला हा भोला भाबडा समाज आत्ता परयंत फसत आला आहे या दुष्ट चक्रातुन बाहेर पडायच असेल तर आता कोनतरी मसिहा येण्याची वाट पहात बसण्यात मजा नाही यासाठी यासमाजातील प्रत्येक तरूणाने आपणच नेता आहे अस समजुन कामाला लागाव लागणार आहे त्यासाठी आत्तापासुन तयारीला लागलतर येणार्या जिल्हा परिषदेला त्याचा रिजल्ट पहायला मिलेल व येणार्या 2024 ची लोकसभा व विधानसभेला प्रस्थापित पक्षाला धडकी भरल्या शिवाय राहणार नाही.
0