औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव: खरिपाच्या उत्पन्नावर झाली रब्बी मक्याची पेरणी,शेतात पडलेला मका ताशी लागला,सोयगाव तालुक्यातील स्थिती

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यात झालेल्या अवकालीच्या नुकसानीच्या पिकांची शेतातून पंचनाम्याच्या भीतीने अद्यापही शेतकऱ्यांनी कुजलेल्या उत्पन्नाची उचल न केल्याने जागेवरच या पिकांना कोवळे अंकुर फुटल्याने खरिपाच्या कुजक्या उत्पन्नात सोयगाव तालुक्यातील रब्बीची पेरणी झाली आहे.मका पिकांचे अंकुर ताशी लागले आहे.त्यामुळे यंदाच्या रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदी न करण्याची वेळ आल्याचे दाटून आलेल्या कंठात शेतकऱ्यांनी बोलून दाखविले.
सोयगाव तालुक्यात नुकतीच झालेली अतिवृष्टीचा शेतातील ओलावा आणि गुलाबी थंडीची सुरु झालेली चाहूल यामुळे सोयगाव तालुक्यात रब्बीच्या हंगामासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असतांना अतिवृष्टीच्या काळात मात्र रब्बीच्या पेरण्याचा मुहूर्त निघून गेल्याने सोयगाव तालुक्यात रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या होत्या,परंतु पेरण्या न होवू शकलेल्या सोयगाव तालुक्यात कुजलेल्या हंगामाच्या उत्पन्नाने बाळसे धरले असून कुजलेल्या उत्पन्नावरील मक्याला कोवळे अंकुर फुटले असाल;याने यंदाची सोयगाव तालुक्यातील रब्बीची पेरणी कुजलेल्या हंगामावर झाल्याचे आढळून येत आहे.पंचनाम्याच्या धास्तीने शेतकऱ्यांनी कुजलेल्या मक्याचे उत्पन्न असलेले आडवे पडलेले कणीस उचलल्याने या कानिसावर नवीन फुटवे आले होते या फुटव्यांचे आता अंकुर तयार झाल्याने शेत पुन्हा बहरले आहे.
...............................................
सोयगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीचे केंद्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण मदतीचे पंचनामे पूर्ण झाले असून मात्र विमा काढलेल्या पिकांचे विमादावे अद्यापही पोर्टलवर अपलोड झालेले नसल्याने विमाधारक शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून मदतीपासून डावलण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे,नुकसानीच्या आठवडाभराच्या कालावधीनंतरही शेतकरी विमा दावे अपोल्द करण्याच्या प्रक्रियेपासून दूर असल्याने सोयगाव तालुक्यात विमा दावे अपलोड करण्याच्या प्रक्रियेपासून कोसो दूर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळे या शेतकऱ्यांना कंपनीकडून मदत मिळण्याच्या अपेक्षा मावळल्या आहे.

पंचनामा पथकाच्या कर्मचाऱ्यांना विमा कंपन्या अधिकृत याद्या पुरवेना-
त्यातच महसूल,कृषी आणि पंचायत कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्यासाठी संबंधित विमा कंपन्या अद्यापही शेतकऱ्यांच्या याद्या पुरवीत नसल्याने गोंधळात पुन्हा वाढ झालेली आहे.याद्या नसल्याने आणि विमा दावे भरलेला अर्ज कोणाकडे जमा करावा या समस्येने अद्यापही शेतकरी संभ्रमात असून पंचनामा पथक मात्र विमा दावे भरण्यासाठी याद्याअभावी अनुत्सुक दिसत आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.