शेतकऱ्यांनी वारणवार सांगून देखील महावितरण कर्मचाऱ्यांना सांगून देखील विद्युत तारा काढल्या नसल्यामुळे गाईच्या मृत्यू झाला असल्याने शेतकऱ्यांला महावितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्यात यावी – गणेश कवडे
पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा येते अनेक दिवसा पासून विद्युत तारा जमिनी जवळ लोंबकळत आहेत गावकऱ्यांनी वारंवार सांगून देखील महावितरण कंपनीने विद्युत तारा दुरुस्त केल्या नसल्याने शनिवार दिनांक 9/11/2019 रोजी घुमरा पारगाव येथे विद्युत प्रवाहाच्या तारा जमिनी जवळ लोंबकळत असल्याने आबासाहेब पांडुरंग सोनसळे यांच्या मालकीची गाय विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेला स्पर्श झाला़ व तिचा जागीच मृत्यू झाला ही माहिती कळल्यावर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असलेली तरी पंचनामा झाला का नाही शेतकऱ्यांना माहिती नसल्याने आधीच परतीच्या पाऊसाने हातचे पीक घेल्याने शेतकरी सोनसळे परेशान आहेत त्यातच महावितरणच्या गलथान कारभारामुळे गाईचा विद्युत तारेला स्पर्श होऊन पन्नास हाजार रूपये किंमतीच्या गाईचा मृत्यू झाल्याने सोनसळे हायरान झाले असुन आपण पुढे काय करावा हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याने घुमरा पारगाव मधील शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण कर्मचाऱ्यांना सांगून देखील विद्युत तारा काढल्या नसल्यामुळे गाईच्या मृत्यू झाला असल्याने शेतकऱ्यांला महावितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांनी केली आहे.