परळी वैद्यनाथ:आठवडा विशेष टीम― भारताचे पहिले शिक्षण मंत्री अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती वसंतराव मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांच्या निवासस्थानी संपन्न झाली भारत देशामध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्या मध्ये महत्त्वाचा वाटा त्यांचा असून स्वातंत्र्यलढ्यात व काँग्रेसच्या सरकारमधील शिक्षण विभागाचा देशभर प्रसार करण्याचे महत्त्वाचे योगदान त्यांचे आहे तत्कालीन राष्ट्रीय नेते देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू सरदार वल्लभाई पटेल व इतर नेत्यावर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात शिक्षण विभागा संदर्भात प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महिला शिक्षण वैज्ञानिक शिक्षण संगीत कला साहित्य उच्च शिक्षण वर भर देऊन देशाला त्यांच्या कामाची आठवण सतत येत असते त्यामुळे या महान नेत्यास भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मान केला आहे त्यांचे कार्य मार्गदर्शक म्हणून तरुण पिढीला प्रेरणा देणारे आहे असे मार्गदर्शन काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी केले याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस माजी नगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबू नंबर दार आदर्श शिक्षक डी एल गायकवाड सय्यद अल्ताफ विष्णू दराडे भालचंद्र कराड विश्वनाथ गायकवाड गणपत कोरे अरुण दराडे राहुल भोकरे जब्बार भाई भगवान ढाकणे लहुदास तांदळे शेख जावेद आणि आश्रुबा घुगे रावसाहेब जगताप वैजनाथ होळंबे गुलाब देवकर थावरे पाटील अॅड उमर् दंड इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना सय्यद अल्ताफ व आभार शेख जावेद यांनी केले.
0