सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह परिसरातील जरंडी,निंबायती,या भागातील बी एस.एन.एलचे सर्व मनोरे बंद अवस्थेत असल्याने परिसरातील २१ गावांना इंटरनेट सुविधा ठप्प झाली असून शहरातील शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे.सध्या अवकाळीच्या नुकसानीचे शेतकऱ्यांची नुकसानीची माहिती अपलोड करण्याचे काम महसूल,कृषी आणि पंचायत समितीच्या विभागांनी हातात घेतली असून ब्रोडबँड बंद असल्याने मोठा गोंधळ उडाला होता,याकडे संबंधित विभागाचे मात्र दुर्लक्ष झालेले आहे.
सोयगाव शहरातील मुख्य मनोर्यासह परिसरातील जरंडी,निंबायती या भागातील बी.एस.एन.एल चे मनोरे ठप्प असल्याने सोयगाव परिसरातील २१ गावांना कनेक्टीव्हिटी मिळाली नसल्याने सोमवारी मोठा गोंधळ उडाला होता.यासोबतच ब्रोडबँडची सुविधाही ठप्प झाल्याने शासकीय कार्यालयासह बँकांचा कारभार ठप्प झाला होता.दरम्यान याकडे संबंधित विभागाचे सोयीस्कार दुर्लक्ष झाले असल्याने रात्री उशिरापर्यंत सुविधा सुरळीत झाली नव्हती.शहरातील मुख्य मनोरा ठप्प झाल्याने मोबाईल धारकांची कोंडी झाली होती.परिसरातील २१ गावातील नागरिकांचाही संवाद बंद झाला होता.
जरंडीच्या मनोर्यात आठवडाभरापासून बिघाड-
जरंडी आणि निंबायती येथील बी.एस.एन.एलच्या मनोऱ्यात आठवडाभरापासून बिघाड झालेला असून सोयगावच्या संबंधित विभागाने या मनोऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे जरंडी,निंबायती परिसरात आठवडाभरापासून सेवा ठप्प झाली आहे.या प्रकारामुळे ग्राहक वैतागाले आहे.