दिव्यांग व्यक्तींना सन्मानाची वागणूक हवी असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक पी. टी. पाटील यांनी शाळेत जागतिक अपंग दिन साजरा करतानाच्या वेळी अध्यक्षीय भाषणात सांगितले. विद्यार्थ्यांसमोर बोलतांना पाटील यांनी सांगितले की, दिव्यांग व्यक्ती ही संघर्षात जीवन जगत असते. दिव्यांग व्यक्तींच्या यातना ह्या त्यांनाच ठाऊक असतात. त्यांच्यात काम करण्याची क्षमता अधिक असते. दिव्यांग व्यक्ती ही शरीराने जरी दिव्यांग असली तरी ते मनाने अभंग असतात. समाजात त्यांना सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे.
याप्रसंगी शाळेतील दिव्यांग विद्यार्थी कृष्णा खाटीक, पुजा बनकर, अक्षय सपकाळ, आरती बेलदार तसेच पहूर कसबे कन्या शाळेच्या उपशिक्षका श्रीमती किर्ती घोंगडे, लेलेनगर शाळेचे उपशिक्षक गणेश राठोड, संतोषीमातानगर शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती सुवर्णा मोरे आणी पाळधीचे पेंटर कैलास गीते यांचा सत्कार मुख्याध्यापक पी. टी. पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देवून करण्यात आला.
कार्यक्रमास पालक मनिषा कुमावत, देविका शेळके, रेखा खाटीक तसेच शाळेतील शिक्षक श्रीमती चित्रलेखा राजपूत, दिनेश गाडे, रत्नमाला काथार, रोहिणी शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश गाडे यांनी केले व आभार मानले.
0