परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― महावितरणच्या मनमानी व अनागोंदी कारभाराबद्दल परळीच नव्हे तर बीड जिल्ह्यातील वीज ग्राहक व शेतकऱ्यांना मध्ये तीव्र नाराजी व संतापाची लाट उसळली आहे. तरी महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करून वेठीस धरत आहेत. महावितरणच्या कारभार सुरळीचालू ठेवण्यासाठी अधिक्षक अभियंता संजय सरग यांची ताडकेफडकी बदली करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते श्रम व रोजगार विभागाचे चेअरमन वसंतराव मुंडे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची भेट घेऊन लेखी तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, महावितरणच्या अंतर्गत बीड मंडळांतर्गत बीड व अंबाजोगाई विभाग आहेत. यामध्ये अधिक्षक अभियंता सरग यांनी पदभार घेतल्यापासून महावितरणच्या कारभाराचा बट्ट्याबोळ उडोला आहे. खोट्या रिडींग दाखवून बनावट बिले ग्राहकांना पाठवून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची लूट करण्याचा महावितरणचा मोठा कट असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात असंख्य तक्रारी महावितरण कार्यालयात दाखल झाले असून त्याबाबत महावितरण कंपनीने बील दुरुस्तीची थातुरमातुर मोहीम राबवली आहे. परंतु जे ग्राहक महावितरण पर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांना अवाढव्य बीलाचा सामना करावा लागणार आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यावर जबर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे. अंबाजोगाईत असा प्रकार वीज ग्राहकास मोठ्या प्रमाणावर बिले दिल्यामुळे उपोषणाचे अवलंब करावा लागला. तसेच अंबाजोगाई, परळी, तेलगाव, केज, माजलगाव, धारूर,बीड,आष्टी, शिरूर उपविभागातील अनेक वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. अधिक्षक अभियंता यांच्या विरोधात बीड मंडळातील ग्राहकांच्या व शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी निर्माण झाल्या आहेत. अनेक गावच्या शेतकऱ्यांना वेळेवर रोहित्र दुरुस्ती करून मिळत नाही. दोन मिळत मिळत नाहीत. अवैधरित्या होणारी वीजचोरी रोखण्यासाठी आळा बसविला नाही. तसेच वीज बिल दुरूस्तीमुळे थकबाकीचा आकडा वाढलेला आहे. वीज बिल दुरूस्ती त्यांना अद्याप हाताळता आलेली नाही. शेतकरी दुष्काळामुळे त्रस्त असताना देखील विद्युत पुरवठा खंडीत केला जातोय परंतु वीज चोरांवर कारवाई केली नाही. शेतकऱ्यांना रात्रपाळीची वीजपुरवठा न करता दिवसांत घावा अशा अनेक मागण्याचे निरांकारण अधिकारी यांनी केले नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील महावितरणच्या काराभाराचा धिंगाणा झाला आहे. तसेच त्यांच्या आरेरावीच्या बोलण्यामुळे अनेक अधिकारी – कर्मचारी मानसिक तणावात आहेत. प्रत्येक उपविभागातील बैठकीत अधिकारी कर्मचाऱ्यांना उध्दटपणे बोलतात. त्यांच्या कार्यकाळात अनेक कृषी पंपाची कामे रखडलेली आहेत. एक शेतकरी एक डी पी योजना त्यांना बीड जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात अपयश आलेले आहे.अनेक कामे अजून अपूर्णच आहेत. त्यांनी त्यांच्या मर्जितल्या आनेक आधिकार्यांना विविध प्रकरणांमध्ये वाचवालेले आहे. वारंवार विदयुत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे येथील नागरीक हैराण होत आहेत. विजेची समस्या असून ग्रामीण भागातील अनेक गावांत विज पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने ग्रामस्थांत असंतोष निर्माण झाला आहे. अनेक वाड्यांमध्ये कमी दाबाचा विद्युत पुरवठा व गंजलेले पोल असल्याने धोका निर्माण झाला आहे़ त्यावर कारवाई केव्हा करणार? वेळीच विज पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे असंतोषाचा भडका नेहमीच उडत आहे. जिल्ह्यातील अनेक गावे अर्धे अंधारात आहेत. अन्य गावातील वीज प्रश्न नागरिकांनी वीज वितरण विरोधात जनतेच्या मनात संतापाची भावना आहे़. या आगोदर महावितरण कंपनीचे बीड मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयात भंगार घोटाळा झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती व दक्षता पथका मार्फत करावी करावी अशी मागणी केली होती. ही कारवाई अद्याप ठप्प आहे. यामुळे वीज ग्राहक व शेतकऱ्यांमध्ये अधिक अभियंता यांच्या कारभारामुळे संतापाची लाट उसळली आहे. बीड महावितरणचे अधिक अभियंता संजय सरग यांची बदली तात्काळ करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते तथा श्रम व रोजगार विभागाचे वसंतराव मुंडे यांनी केली आहे. खंडित होणारा व कमी दाबाचा वीज पुरवठा याबाबत उपाययोजनांसाठी पावसाळी मेंटेनन्स कामे , वीज वाहिन्यांना गार्डिंग करावे, झाडी तोडणे यासह अन्य कामे प्राधान्याने करण्याची आवश्यकता असते मात्र थातुरमातुर केल्यामुळे वीज वारंवार ट्रिप होत असते. तसेच यांनी महावितरणचा पदभार घेत्यापासून ते आजपर्यंत सर्व कामांची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. हा सर्व प्रकारच्या बाबतीत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.