आठवडा विशेष|प्रतिनिधी
पुणे :शेतकरी संघटनेच्या बेमुदत आंदोलनासाठी आलेल्या शेतक-यांना पोलिसांनी साखर आयुक्त कार्यालयातील झेंडावंदनास प्रतिबंध केल्यानंतर 26 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9 वाजता साखर आपुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकरी संघटनेच्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या मंडपात येवून आंदोलकांची भेट घेतली.त्यांच्याशी रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी चर्चा केली.
– दोन साखर कारखान्यामधिल अंतराची अट रद्द करण्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने देवेंद्र सरकारला सादर करण्याचे आश्वासन साखर आयुक्तांनी दिले.
-मागिल आणि चालू हंगामाची FRP एकरकमी घेतल्याशिवाय बेमुदत धरणे आंदोलन परत घेणार नाही.असे रघुनाथदादा पाटील,कालिदास आपेट यांनी स्पष्ट केले.
-आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या शेतक-यांना FRP देण्याबाबतचा प्रस्ताव साखर आयुक्तांच्या विचाराधिन असल्याने साखर कारखान्याला ऊस घातलेली बिले घेवून शेतक-यांनी पुण्याला यावे असे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने कालिदास आपेट यांनी केले.
0