परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

8 फेब्रुवारी ला चांदापुर (ता.परळी) येथे 6 व्या अखिल भारतीय बौद्धधम्म परिषदेचे आयोजन

धम्म परीषदेची जय्यत तयारी ; मोठ्या संख्येने सहभागी व्हा-स्वागताध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांचे आवाहन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
परळी तालुक्यातील मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ही शनिवार,दि 8 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता सहाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परीषदेची जय्यत
तयारी करण्यात आली असून तयारीसाठी धम्मप्रेमी जनतेने पुढाकार घेतला आहे.या धम्म परिषदेला पुज्य भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा),पुज्य भिक्खू पय्यानंद (लातूर),पुज्य भिक्खू ज्ञानरक्षित (औरंगाबाद),पुज्य भिक्खू धम्मशील (हिंगोली), पुज्य भिक्खू पय्यारत्न (नांदेड) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी,चोखामेळा सहकारी सोसायटी वसंतनगर चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून या धम्म परिषदेला धम्मप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन धम्म परिषदेच्या स्वागताध्यक्षा बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिवाजीराव सिरसाट व परिषदेचे अध्यक्ष अॅड. अनंतराव जगतकर,संयोजक तथा तक्षशीला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवनचे अध्यक्ष चंद्रकांत साधु इंगळे व प्रा.प्रदिप रोडे आदींनी संयुक्तरित्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवन (ता.परळी जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी,मौजे चांदापुर,ता.परळी येथे शनिवार,दि 8 फेब्रुवारी 2020 रोजी होणार्‍या सहाव्या बौद्ध धम्म परिषदेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.सहाव्या धम्म परिषदेची सुरूवात सकाळी 9 वाजता पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने होईल.यावेळी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे,आमदार प्रकाशदादा सोळंके,आमदार संजयभाऊ दौंड,माजी आमदार पृथ्विराज साठे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.या बौध्द धम्म परीषदेच्या स्वागताध्यक्षपदी बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिवाजीराव सिरसाट या असणार आहेत.परिषदेच्या अध्यक्षस्थानी आयु.अ‍ॅड. अनंतराव जगतकर (अध्यक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनी) तर यावेळी धम्मपीठावर परळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिलाताई गित्ते,जि.प.सदस्य प्रा.डॉ.मधुकर आघाव,जि.प.सदस्या आशाताई संजयराव दौंड,प्रा.डॉ.अर्चनाताई कांबळे (कोल्हापुर),नालंदा अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर वडमारे,परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिकआण्णा कराड,सरपंच डी.एस.राठोड,सरपंच भामाबाई हानवते,उपसरपंच श्रीहरी गित्ते, प्रा.डॉ.विनोद जगतकर,परळी न.प.चे स्वच्छता समितीचे सभापती किशोर पारधे,स्वच्छता निरिक्षक शंकर साळवे, नगरसेवक नितीन रोडे,अनंत इंगळे,दत्ता सावंत (परळी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संयोजन समितीने चांदापुर येथे होणार्‍या या धम्म परिषदेची सर्व तयारी पुर्ण केली आहे.वसंतनगर तांडा रस्त्यापासून वृध्द,अपंग व महिला यांना जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी संयोजन समितीने पुढाकार घेतला आहे.तरी परळी व अंबाजोगाई तालुक्यातील धम्मप्रेमी जनतेने पांढरे वस्ञ परिधान करूनच धम्म परिषदेस उपस्थित रहावे असे आवाहन तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाणचे चंद्रकांत इंगळे, प्रा.प्रदिप रोडे,राजेंद्र घोडके, राहुल घोडके,प्रा.गौतम गायकवाड,सचिन वाघमारे, जगन सरवदे,विश्‍वनाथ भालेराव,सिमा इंगळे आदींनी केले आहे.


Back to top button