परळी तालुकाबीड जिल्हा

भारतरत्न सर डॉ.सी.व्ही. रमण हे देशाचे भूषण– प्रा. डॉ.सुधाकर भुसारे

परळी:आठवडा विशेष टीम― जवाहर शिक्षण संस्था संचलित वैद्यनाथ कॉलेज मध्ये 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन बी.एस्सी आणि एम.एस्सी च्या विद्यार्थ्यांनी डॉ. अे. पी. जे.अबुल कलाम अभ्यास मंडळ अंतर्गत मोठ्या उत्साहात उत्स्फूर्त पणे साजरा केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. व्हि.केंद्रे हे होते, तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी चे सहयोगी प्राध्यापक डॉ.एस.आर. भुसारे तसेच मंचावर डॉ. डी. व्ही. मेश्राम ,डाॅ .व्ही .बी. गायकवाड ,प्रा. एस. व्ही. रेनुकदास उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ.एम.जी.लांडगे यांनी के लीं तसेच पाहुण्याचा परिचय प्रा. अनिल वडाल यांनी केला.
डॉ.भुसारे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, 28 फेब्रुवारी 1930 हा दिवस भारतासाठी सोन्याचा दिवस ठरला कारण त्याच दिवशी सर सी.व्ही.रमण यांना ”रमन परिणाम” या संशोधनासाठी पदार्थ विज्ञान विषयातील नोबेल पारितोषिक घोषित झाले आणि सर्व विज्ञान प्रेमींना परमोच्च आनंद प्राप्त झाला. मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्न व कृत्य प्रदर्शित करून सांगोपांग चर्चा आणि विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची अमलबजावणी, वैज्ञानिकांच्या विचारांना संधी देण्यासाठीच भारत सरकार आजचा विज्ञान दिन साजरा करते. सन 2020, राष्ट्रीय विज्ञान दिवसाची थीम ” विज्ञानातील महिला” वुमेन्स इन सायन्स असल्याने प्रत्येकाने महिला संशोधकांना ओळखून त्यांच्या संशोधनास चालना मिळेल, विज्ञान-तंत्रज्ञानाचा वेग वाढेल, जैवविविधतेला पूरक असा विकास होऊन जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून सदरील चे सहकार्य देशास भूषणवाह ठरेल.सदरील च च्या विवेचनात त्यांनी स्वतःचा उच्च शिक्षणातील घेतलेल्या इस्राएल आणि साऊथ कोरिया येथील विविध अनुभवाचे कथन केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. बी. व्हि. केंद्रे म्हणाले की विज्ञानाने खरोखरच आपल्या सर्वांचे जीवन सुखकर केलेले आहे.
एखाद्या गोष्टीचा शोध लावणे आणि ती समाज उपयोगी बनवण्यासाठी शास्त्रज्ञांना दिवस-रात्र कष्ट करावे लागतात. आपण सर्वांनी भविष्यात खारीच्या वाट्याने संशोधन कार्यास हातभार लावून समाजाप्रती चे ऋण व्यक्त करून मातृभूमीची तसेच देशाची सेवा करावी हीच अपेक्षा. कार्यक्रमास प्रा. हरदास , पूजा मुंढे मॅडम, भक्त मॅडम व चाटे मॅडम आणि अनेक विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचलन संयोजक डॉ.एम.जी.लांडगे यांनी केले तर आभार वागेश्र्वर मोती यांनी मानले.

Back to top button