बीड:आठवडा विशेष टीम―मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील टेंडरप्रमाणे प्रस्तावित मागॅ राज्यमागॅ 56 लिंबागणेश ते काटवटेवस्ती ते अंजनवती ते घारगांव असा 6.8 की.मी.प्रस्तावित रक्कम 4 कोटी 87 लाख असून संबधित गुत्तेदार मदन मस्के हे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे बंधु असून मनमानी कारभार करत अंजनवती ते लिंबागणेश असा रस्ता करण्यास सुरूवात केली असून काटवटेवस्ती वरील ग्रामस्थांना मुलभुत सुविधेपासून वंचित केल्यामुळे अंजनवती येथिल सरपंच सुनिल दादाराव येडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा होऊन सुचक राजेभाऊ काटवटे व अनुमोदक कैलास दगडु काटवटे यांच्यासह ग्रामस्थांनी एक मताने ठराव संमत केला की शासकीय टेंडरप्रमाणे लिंबागणेश ते काटवटेवस्ती ते अंजनवती ते घारगांव असा रस्ता करण्यात यावा.या प्रकरणी चुकीच्या पद्धतीचा चालु रस्ता बंद करून मा.धनंजयजी मुंढे साहेब सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा पालकमंत्री बीड आणि बीड विधासभा आमदार संदिपभैय्या क्षीरसागर यांना लेखी तक्रार दाखल केली आहे. परंतु गुत्तेदार अरेरावीची भाषा करत आहे.
तसेच भाळवणी ते लिंबागणेश रसत्यासाठी पिंपरनई शिवारात दोन अवैध खदानी खोदल्या असून त्यांना शासनाची परवानगी नाही तसेच वाळू बिंदुसरा नदिच्या पाञात पिंपळवंडी गावातील गोरगरीबांना उपसा करायला लावून कामाच्याठिकाणी नेणे.तसेच रसत्यासाठी शेजारील मुरूम टाकण्यासाठी 25 लाख रू.किंमतीची रोहयो अंतर्गत वृक्षसंगोपण जेसीबी मशिन ने उकरून फेकून दिले आणि मुरूम नाळवंडी येथून आणल्याचे दाखवले आहे..
तसेच पाटोदा तालुक्यातील पाटोदा राज्यमागॅ 56 ते ढाळेवाडी 6 कि.मी. रसत्यासाठी प्रस्तावित अंदाजे किंमत 3 कोटी 22 लाख रू.ज्यामधे रस्ता सुरू करण्याची तारीख 2018 & रस्ता पुणॅ केल्याची तारीख 23 / 08 / 2019 दिली आहे. परंतु आज दि. 9 / 03 / 2020 पयॅत काम सूरूच केले नाही.
तसेच महाजनवाडी येथिल सुरवसे पठाणवस्ती वरील ग्रामस्थांना सिंगल फेज ट्रान्स्फर न देताच अवास्तव विजबिल वसुली करण्याच्या निषेधार्थ व मुळुक गावातील बारव & बेलेश्वर वस्तीवरील ग्रामस्थांना लवकरात लवकर विजपुरवठा सुरळीत चालु करण्यात यावा.
यावेळी निवेदन तहसीलदार आंबेकर व सचिन पुंडगे नेकनुर सहाय्यक पोलिस निरीक्षक नेकनुर ठाणे यांनी स्विकारले.यावेळी सुनिल येडे राजेभाऊ काटवटे, कैलास काटवटे, युवराज सुरवसे, बाळू सुरवसे. दिपक जगदाळे तसेच महिला व शालेय विद्यार्थी, विद्याथीॅनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.