आठवडा विशेष टीम―कोरोना विषाणूसंसर्ग प्रादुर्भाव हे संकट हे राष्ट्रीय आपत्ती सारखे असून त्यानुसार सर्व घटकांना मदत जाहीर करावी असे मत व आवाहन शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील कुंझरकर यांनी केले.
दरम्यान कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू झाली असून संचारबंदी ही जनतेच्या आरोग्यासाठी जनतेच्या हितासाठी कुटुंब व देशाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असून करोणा हे संकट गंभीर आहे परंतु सरकार खंबीर आहे आपण आपले घर शक्यतोवर सोडू नये घरातच थांबावे, शक्य झाले तर रक्तदान करावे अशी विनंती केली ही बाब महत्त्वपूर्ण असल्याने सर्वांनी राज्य सरकार जे जे निर्देश देईल त्याचे शिस्तीत तंतोतंत पालन करावे असेही त्यांनी म्हटले.
पुढील काही दिवस राज्यातील देशातील सर्वांसाठीच कसोटीचे असून संयम शिस्त व आरोग्यविषयक सवयींचे तंतोतंत पालन केल्यास निश्चितच आपण त्यावर मात करू फक्त घर सोडू नये असे त्यांनी म्हटले.