क्राईमपरळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

परळी: तहसीलदारांची विटभट्टयांवर धडक कारवाई ; ३ विटभट्टी मालकांविरोधात गुन्हा दाखल

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उद्योग, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असतानाही विटभट्टी चालू ठेवल्याबद्दल तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी सिरसाळा येथे विटभट्टी चालकाविरुद्ध धडक कारवाई करीत तिघांविरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या कोरोनामुळे नागरीक परेशान आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्य़ातील सर्व उद्योग, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही सिरसाळा परिसरात विटभट्ट्या सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर परळीचे तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी थेट विटभट्टीवर जाऊन पाहणी केली असता शेख नजीब शेख नासेर, सय्युम पठाण मुहम्मद पठाण, रामेश्वर नारायण चव्हाण सर्व रा. सिरसाळा यांच्या विटभट्ट्या चालू असल्याचे निदर्शनास आले.
यावरून सिरसाळाचे तलाठी युवराज सोळंके यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.