कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीशैक्षणिक

लिंबागणेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय पोषण आहाराचे वाटप– डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मा.राहुलजी रेखावार जिल्हाधिकारी बीड आणि मा.अजितजी कुंभार मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड यांनी दिलेल्या आदेशानुसार दि.१६ /०३/ २०२० ते ३१/०३/२०२० पर्यंत बंद होत्या. दि.२९ /०३/२०२० रोजी मा.राहुलजी रेखावार यांच्या आदेशानुसार दि.०१/०४/२०२० व दि.०२/०४/२०२० रोजीच्या कालावधीत विद्याथ्यांना शालेय पोषण आहार वाटप करणेसाठी संबंधित शिक्षक, कमंचारी , शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, विद्याथीं व त्यासमवेत असलेल्या एका व्यक्तिस / पालकास सकाळी ७ वा.पासुन ते ११ वा.पर्यत जमावबंदी व संचारबंदी आदेशातुन सुट देण्यात आली आहे.

मुख्यध्यापक सजेंराव मोराळे: जिल्हाधिकारी बीड व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड यांच्या आदेशानुसार आज १ मिटर अंतराचे चौकोन आखून सोशलिंग डिस्टंन्स राखुन विद्यार्थ्यांना उभे करून रांगेत. हजरी पटावरील नावाप्रमाणे शालेय पोषण आहार तांदूळ , हरबरा , तुरदाळ , मटकी समप्रमाणात विभागून देण्यात आले.

हवं सुविधा उपलब्ध आहेत परंतु शाळेला कुंपण नसल्यामुळे काही ग्रामस्थ येथे घाण करतात त्यामुळे विद्याथ्र्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.त्यामुळे शाळेला संरक्षक भिंत असावी.

पुरी अमर सहशिक्षक:शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, तेव्हा ग्रामस्थांनी लोकसहभागातून वृक्षरोपण व त्यासाठी सुरक्षाजाळी गावातील शिक्षणप्रेमी , संवेदनशील नागरिक महारूद्र वाणी , गणपत तागड , ग्रा.पं.सदस्य गणेश लिंबेकर , समीर शेख , सुरेश ढवळे यांनी दिली आहेत.एक दिली असुन ईतर कोरोना विषाणु ( vivid 19 ) रोगाच्या साथीमुळे गैरज बंद आहेत नंतर देण्याचे ठरले आहे. वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपण हा अत्यंत महत्त्वाचा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक भाग असुन त्याविषयी विद्याथ्यांना माहिती दिली जाते.

पार्वतीबाई गायकवाड आणि वत्सलाबाई वाणी :

शाळेत मध्याहन भोजन योजनेतून सोमवारी दाळ ,तांदळाची खिचडी , मंगळवार उसळ,आमटी भात, बुधवार व्रत, आमटी भात , गुरुवार दाळ ,तांदळाची खिचडी , शुक्रवार आमटी ,उसळभात , शनिवार वरण,आमटी भात देण्यात येतो.

लिंबागणेश जि.प.प्रा.शाळेत मुख्याध्यापक सर्जेराव मोराळे सह ७ शिक्षक नामे अमर पुरी , भरत चौरे , संदिपान आगम, रमेश चव्हाण, माधुरी कुलकर्णी , शोभा कदम आहेत त्यांनी विद्याथ्यांचा शिक्षणाचा दर्जा उंचावल्यामुळे बाहेरगावी चौसाळा, वडगांव येथे इंग्लिश स्कुलमधे जाणा-यांची संख्या कमी होऊन पालकांनी आपली मुले जि.प.प्रा.शाळेत शिक्षणासाठी पाठवली आहेत.
सरपंच सौ.निकिताताई गलधर यांनी १४ वर्मा वित्त आयोगातून फरशीकाम , शाळेला रंगरंगोटी करून शाळा डीजिटल करण्यात आली आहे. शाळेला शौचालय , तसेच शुद्ध पिण्याचे पाणी यासाठी वांटर प्युरीफायर तसेच शिवजयंतीच्या निमित्ताने शाळेला २ संगणक भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्निलभैय्या गलधर यांनी भेट स्वरुपात दिले आहे. शाळेला संरक्षक भिंत असावी अशी मागणी मुख्यध्यापक मोराळे यांनी केल्यामुळे कोरोना विषाणुचा नायनाट होताच सरपंच यांच्याकडे संरक्षक भिंतींची मागणी करण्यात येईल.

―डॉ गणेश ढवळे,सामाजिक कार्यकर्ते बीड


Back to top button