अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीहेल्थ

आरोग्यमंत्री टोपे,महसूल मंञी बाळासाहेब थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले रक्तदान

रक्ताचा तुटवडा होऊ नये यासाठी जिल्हा काँग्रेसचे रक्तदान

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.रक्तदान करा या आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व महसूल मंञी तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी स्वत: कार्यकर्त्यांसह रक्तदान केले.येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या ब्लड बँकेत शुक्रवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.पहिल्याच दिवशी 41 जणांनी रक्तदान केले.पुढील काही दिवसांत
रूग्णालयाच्या आवश्यकतेनुसार
टप्प्याटप्प्याने 500 जण रक्तदान करतील अशी माहिती आयोजक बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळी दिली.

सध्या अंबाजोगाईसह राज्यात लॉकडाऊनची परस्थिती आहे.दुसरीकडे रक्ताचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार जिल्हा काँग्रेसने अगदी कमी वेळेत शुक्रवार,दिनांक 3 एप्रिल रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते या शिबिरात बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक वाजेद खतीब,राणा चव्हाण,शेख मुख्तार,सय्यद अमजद सय्यद शब्बीर, निखिल मनोज लखेरा,मयूर मनोज लखेरा,महेश वेदपाठक,ऋषिकेश लोमटे, नरसिंग साबणे,चेतन परदेशी,पाशा गवळी, कल्याण सरवदे,धनंजय सुर्वे,सतीश दरवेशवार, अनिल भंडारे,दयानंद गुजर,रघु जाधव,रमेश सुरेवार,शाकेर पठाण, अनिस खान पठाण,संदीप दरवेशवार,नितीन जाधव, रियाज खान पठाण,शंकर गवळी,अनंत कांबळे, किशोर बलुतकर,आशुतोष पवार,रईस खान पठाण, सय्यद आतिफ हसन,सय्यद इलाही रियाज,राजेश कोकाटे,शेख अतीख,सुरज नखाले,शेख लतीफ, बाबूलाल मुजावर,शेख मोहम्मद रहमान आदींनी रक्तदान केले.रक्तदान शिबिर प्रसंगी स्वा.रा.तीचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक धम्मपाल सरवदे,सहयोगी प्राध्यापक डॉ.अरविंद बगाटे,प्रभारी अधिकारी डॉ.विनय नाळपे हे उपस्थित होते.तर शिबिरासाठी रक्त संक्रमण अधिकारी डॉ.दत्ता चिकटकर,डॉ.रमा साठवणे, तंत्रज्ञ सय्यद मुश्ताक,किरण चव्हाण,परिचर महेबूब शेख,श्रीराम कुंजटवाड यांचे सहकार्य लाभले.

रक्तदात्यांना दिली वेळ

सकाळी 9 ते 12 या वेळेत रक्तदात्यांना वेळ ठरवून देण्यात आली होती.त्यामुळे रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दीही झाली नाही.आयोजक,रक्तदाते आणि ब्लड बँकेच्या डॉक्टर व कर्मचा-यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत प्रत्येकांमध्ये किमान एक मीटर इतके अंतर ठेवून
सॅनिटायझर आणि मास्कची सुविधा उपलब्ध करून दिली होती.त्यामुळे पहिल्याच दिवशी 41 जणांनी रक्तदान केले.

रक्ताचा तुटवडा आहे,रक्तदान करा ! -राजकिशोर मोदी

येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.तसेच राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व महसूल मंञी तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांनी आपल्या सर्वांना काही दिवसांपूर्वीच आवाहन केले
आहे.त्यामुळे बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज शुक्रवार,दिनांक 3 एप्रिल रोजी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे.आज 41 जणांनी रक्तदान केले. पुढील काळात रूग्णालयाच्या आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने सुमारे 500 काँग्रेस कार्यकर्ते रक्तदान करतील.कोरोना असताना रक्तदान करू नये असं काही नाही.याची संपूर्ण माहिती घेऊन सांगत आहोत.त्यामुळे रक्तदान केल्याने संसर्ग होणार नाही किंवा वीकनेस येणार नाही. रक्ताचा कमी झालेला साठा पुन्हा भरून काढावा.सोशल डिस्टन्सिंग राखून रक्तदान सुरू ठेवावं,फार गर्दी करू नये.रक्तदान हे सामाजिक भान असलेलं कार्य आहे आणि गरजेची बाब आहे. सध्याची ही मागणी आहे.
इच्छुक रक्तदाते,स्वयंसेवी संस्था,सामाजिक संघटना यांनी मोठे कॅम्प न घेता.जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी दहा-दहाच्या ग्रुपमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखून रक्तदान सुरू ठेवावं असंही आवाहन राजकिशोर मोदी यांनी यावेळी केले.