कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजशेतीविषयक

लिंबागणेश आठवडी बाजार बंद, वरिष्ठांच्या आदेश , ग्रामसेवकाची अडचण , ग्रामस्थांचा संताप , गटविकास अधिकारी यांनी समजुत काढली– डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―आज लिंबागणेश येथे भरलेला आठवडी बाजार ग्रामसेवक तेलप पी.जी.आणि पोलिस कर्मचारी यांनी बंद पाडला.यावेळी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व ग्रामस्थांनी बीड मध्ये सोशल डीस्टंन्स राखुन बाजार भरतो त्याप्रमाणे आम्ही ५फुट अंतर राखून रांगेत भाजीपाला विक्री करतो असे विक्रेत्यांनी सांगितले .जर गर्दी झाली तर आमच्यावर कारवाई करावी असे लेखी निवेदन दि. ०६/०४/२०२० रोजी. मा.राहुलजी रेखावार जिल्हाधिकारी बीड , मा.अजितजी कुंभार , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर किसान सभा तालुकाध्यक्ष बीड , किसान पुत्र आंदोलक , मा.स्वप्निल गलधर भाजपा तालुकाध्यक्ष बीड , मा.शंकर वाणी उपसरपंच ग्रामपंचायत लिंबागणेश यांनी दिले होते.
बाजार बंद केल्यामुळे भाजीपाला विक्रेते अत्यंत संतापले होते. त्यानंतर मा.रविंद्रजी तुरुकमारे साहेब , गटविकास अधिकारी पंचायत समिती बीड , मा.शेळके के.बी. विस्तार अधिकारी पंचायत समिती बीड , मा.शेळके एम.ए. जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा ग्रामसेवक युनियन बीड , मा.काशिद एम.व्ही. तालुकाध्यक्ष, ग्रामसेवक युनियन बीड यांनी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यासह ग्रामस्थांची समजूत काढली.

  • रविंद्रजी तुरुकमारे , गटविकास अधिकारी पं.स.बीड: “जिल्हाधिकारी बीड व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यानी दीलेल्या आदेशानुसार आम्हाला काम करणे भाग आहे तुमचे म्हणणे जरी बरोबर असेल कि बीड शहरांप्रमाणे सोशल डिस्टन्स सांभाळून भाजीपाला विक्री करण्यात येईल त्याची जबाबदारी संपूर्णपणे तुम्ही घेत असल्याचे लेखी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना निवेदनाद्वारे कळवले असले तरी वरिष्ठांच्या आदेशानुसार बाजार भरवण्यास मनाई आहे अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल. मोजे चौसाळा, गेवराई , माजलगाव याठिकाणी बाजार भरल्यामुळे सरपंच , ग्रामसेवक यांना निलंबित केले होते तसेच गटविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. म्हणून सहकार्य करावे.”

  • तेलप पी.जे. ग्रामविकास अधिकारी,लिंबागणेश : “मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी लेखी आदेश काढले आहेत.चौसाळा येथे आठवडी बाजार भरल्यामुळे संबंधित सरपंच , ग्रामसेवक यांना नोटीस बजावली आहे,तर काही ठिकाणी निलंबन करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार बाजार बंदी करण्यात आली आहे.त्यांना दारोदारी हिंडून भाजीपाला विक्री करण्याची परवानगी दिली आहे.”
  • डॉ.गणेश ढवळे :बीड शहरात सोशल डिस्टंन्स सांभाळून ज्याप्रमाणे भाजीपाला विक्री करण्याची परवानगी दिली जाते.तसेच कीराणा दुकाने , ग्राहक केंद्र , ब्यांक आदिना संचारबंदी शिथिल कालावधीत सेवा करण्याची परवानगी दिली जाते.त्याप्रमाणे भाजीपाला विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी कारण शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे , रोजगार नाही , तसेच भाजीपाला, फळे नाशवंत असल्याने जास्त दिवस टिकत नाहीत.कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला जागेवरच सडत आहे. त्यामुळे भाजीपाला विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. मा.राहुलजी रेखावार जिल्हाधिकारी बीड आणि मा.अजितजी कुंभार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना हात जोडून विनंती आहे कि किसानपुत्रांना आर्थिक मदत करण्यासाठी आठवडी बाजार भरवण्याची परवानगी देण्यात यावी.यावेळी. मा.शेळके एम.ए. (जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा ग्रामसेवक युनियन बीड , मा.काशिद एस.व्ही. तालुकाध्यक्ष ग्रामसेवक युनियन बीड, शंकर वाणी, उपसरपंच लिंबागणेश , ग्रा.पं.कर्मचारी जिवन मुळे , सुखदेव वाणी , गणेश थोरात , आदि.उपस्थित होते.
Back to top button