बीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

ग्रामिण भागातील स्मशानभुमी मोजताहेत शेवटच्या घटका ; निवारा शेड आणि संरक्षक भिंतीची मागणी―डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल स्मशानभुमी अखेरच्या घटका मोजत असुन निवारा शेडचे पत्रे उडून गेले आहेत, सभोवताली काटेरी बाभळांनी वेढा घातला असुन त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणुन की काय कोरोना विषाणुचा संसर्ग झालेला व्यक्ती बीड जिल्ह्यात आढळुन आला आहे.ग्रामस्थ जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाईत जिल्हा प्रशासनासोबत आहेत.परंतु कोरोना विषाणुचा नायनाट झाल्यानंतर स्मशानभुमी साठी संरक्षक भिंत आणि निवारा शेड देण्यात यावे.

सौ.निकिताताई स्वप्निल गलधर , सरपंच लिंबागणेश :- लिंबागणेश येथिल स्मशानभुमी साठी आलेला निधि गावातील कार्यकर्त्याने मुदतीत स्मशानभुमी न बांधल्यामुळे परत गेला आहे. याचप्रकारे स्मशानभुमीतील रस्ते कामाचा निधि परत जाऊ नये यासाठी त्वरीत रस्ता केला आहे. परत गेलेल्या निधिसंबधात डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि मा.स्वप्निल गलधर यांनी प्रत्यक्ष उप /सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मा. गिरी साहेबांची भेट घेतली असून कोरोना प्रकरण संपुष्टात आल्यानंतर परत गेलेला निधी मंजूर केला जाईल असे आश्वासन गिरी साहेबांनी दिले आहे.

विक्रांत रविंद्र वाणी :-

मराठा समाजातील वाणी आडनावापैकी केशवराव वाणी यांची मुले भालचंद्र वाणी त्यांची मुलं कल्याण वाणी , रविंद्र वाणी , आणि बन्सी (आण्णा)वाणी , सुंदरभाऊ वाणी , उद्धव वाणी , लक्षमण (आप्पा) वाणी , सोपानराव वाणी , देवेंद्र वाणी यांचे पुर्वज यांची ही स्मशानभुमी आहे. ही खाजगी आमच्या भावकींची मिळुन एकत्रित स्मशानभुमी आहे.

उस्मानचाचा तांबोळी ( शेख उस्मान माजी उस्मान भाई ):-

मुस्लिम समाजातील लोकांची स्मशानभुमी असुन आम्ही स्वखर्चाने तारेचे कुंपण बांधले आहे.सरकारने संरक्षक भिंत बांधून द्यावी जेणेकरून आमच्या पुर्वजांच्या कबरी शेजारी लोक घाण करणार नाहीत.

अशोक बारगजे ( साळी समाज) :-

गावामध्ये बारगजे आडनावाची साळी समाजाची ८-१० घरे असुन अंदाजे ४० मतदार आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जि.प.प्रा.शा.आणि पशुवैद्यकीय दवाखाना शेजारी असुन शासनाने संरक्षक भिंत आणि निवारा शेड उपलब्ध करून द्यावे.

अशोक शेषेराव जाधव ( डवरी-गोसावी समाज ):-

डवरी-गोसावी समाजाची एकुण ३० घरे असून १५० मतदार असुन पोटापाण्यासाठी बाहेर गावी लोक वास्तव्यास आहेत.
याठिकाणी तिन्ही बाजूंनी शेतक-यांची वहिवाटी शेतजमिन असुन सरकारने संरक्षक भिंत आणि पावसाळ्यापुर्वी निवारा शेड द्यावे.

परमेश्वर थोरात ( दलित समाज ) :-

गावात थोरात आडनावाची ६० कुटुंब असून लहु थोरात हे ग्रा.पं.स.आहेत, बहुतांश लोक ऊसतोडणी मजूर आहेत. शासनाने निवारा शेड आणि संरक्षक भिंत उपलब्ध करून द्यावी जेणेकरून याठिकाणी गावातील लोक शौचास बसणार नाहीत.

मुस्तफा शेख ( माजी उपसरपंच ) :-

आमच्या मुस्लिम समाजातील ५-६ कुटुंबासाठीची ही स्मशानभुमी ४० बाय. ६० जागेत असुन स्वखर्चाने तारेची संरक्षक भिंत बांधली असून शासनाने पक्की कायमस्वरूपी संरक्षक भिंत बांधून द्यावी.

शांताक्का चंद्रभान पवार ( कैकाडी समाज )

कैकाडी समाजातील रंदावणी बाबासाहेब गायकवाड ही ग्रामपंचायत सदस्य आहेत.आम्हाला आमच्या नावे स्मशानभुमी हवी कारण सध्याची स्मशान भूमी २ कि.मी.अंतरावर असुन आमच्या नाली जागा नसल्यामुळे येथिल लोक अंत्यविधी करण्यासाठी अडचणी येतात.

श्रीहरी दादा निर्मळ ( दलित समाज ) :-

निर्मळ आडनावाची गावात ८० घरे असुन एकुण मतदान ३०० चर्या आसपास मतदार आहेत.बरेचजण पोटापाण्यासाठी मुंबई,पुणे शहरात राहतात. एकुण अडीच एकर स्मशानभुमीची जागा असून अतिक्रमणामुळे कमी कमी होत चालली असुन संरक्षक भिंत आणि पावसाळ्यापूर्वी निवारा शेड द्यावे एवढीच अपेक्षा आहे.

डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर :-

बीड तालुक्यातील ग्रामिण भागातील बहूतेक ठिकाणी सार्वजनिक स्मशानभुमीची हीच दुरावस्था झाली आहे, काही लोकांना शेतजमिनी असल्यामुळे शेतात अंत्यविधी करुन समाधी बांधण्यात येतात.परंतू ज्यांना शेत जमीन नाही ,अथवा शेतजमीन दुर आहे त्यांना तसेच परीट , चांभार , न्हावी आदि.समाजातील लोकांसाठी असलेल्या सार्वजनिक स्मशानभुमी साठी संरक्षक भिंत आणि निवारा शेड उपलब्ध करून देण्यात यावे अशी लेखी निवेदन व्दारे मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी ई-मेल व्दारे मा.राहूलजी रेखावार यांना केली आहे.


Back to top button