कोरोना विषाणू - Covid 19जालना जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

अंबड: जामखेड मधील कोरोना रक्षक समितीला जन क्रांती संघ मार्फत मास्क वाटप

अंबड:आठवडा विशेष टीम―जन क्रांती संघ चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप घुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड तालुक्यातील जामखेड गावांतील अंबड चे पोलीस निरीक्षक श्री नांदेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जामखेड गावातील 11 युवकांची कोरोना रक्षक समिती स्थापन केली आहे ही समिती गावामध्ये येणाऱ्या जाणाऱ्याची नोंद ठेवते आणि पोलीस प्रशासन याना मोलाचे सहकार्य करते त्या मुळे जन क्रांती संघ मार्फत या युवकांची कोरोना ची सावधगिरी असावी म्हणून मास्क वाटप करण्यात आले कोरोना रक्षक समिती मध्ये सुभाष भोजने, सचिन वैद्य, अजय पवार, तुकाराम भोजने,संतोष मंडलिक,भूषण पांढरे, गणेश गवते, विनोद वैद्य या युवकांचा समावेश आहे,या समिती ला मास्क वाटपाचे मुख्य आयोजन जन क्रांती संघ चे युवा नेतेअभिषेक पांढरे ,शिवराज भोजने यांनी केले होते.

Back to top button