ह्रदय हेलावणारा तो प्रसंग-दत्ता हुले
आठवडा विशेष टीम―
मुळचे बीड जिल्ह्यातील असणारे पुरुष,महिला व किशोरवयीन मुली असे एकूण १० ऊसतोड कामगार यामध्ये भगवान चंदू चव्हाण (२५) कविता भगवान चव्हाण (२३) मु.रमाबाई,सोनू नंदू चव्हाण (१८) छाया दत्ता चव्हाण(१९)तांडा ता. माजलगाव जि.बीड,अर्जुन पांडुरंग राठोड (३८) शालू अर्जुन राठोड (३५) पूजा अर्जुन राठोड (१४) नितिनअर्जुन राठोड (४)उत्तम लेमा पवार (३८)कविता उत्तम पावर (३५) सुनीता उत्तम पवार (१४) मु. वारोळा ता. माजलगाव जि.बीड हे शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना लि.न्हावरे ता.शिरूर जि. पुणे येथे ऊसतोड करत होते, मागील काही दिवसांपूर्वी या साखर कारखान्याचा गळीत हंगाम मागेच काही दिवसांपूर्वी संपला होता व हे कामगार त्या ठिकाणी मिळाले तिथे मोलमजुरी करत होते, पण राज्यामध्ये जेव्हा करोना या रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला व खास करून पुणे जिल्ह्यात याचा आकडा वाढू लागला तेव्हा त्यांच्या मुकादमाने ही परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने गावापर्यंत जा,मी तुमची सोय करू शकत नाही हे लक्षात घेऊन सर्वजण निघाले पायी मिळेल त्या रस्त्याने मिळेल त्या मार्गाने त्यांचा प्रवास सुरू झाला.
दि.९ एप्रिल रोजी हे राठोड, पवार व चव्हाण कुटुंब गावाकडे निघाले प्रत्येकाच्या डोक्यावर एक बाचके (खताची गोणी ज्यामध्ये काहीतरी गरजेच्या वस्तू होत्या) दहा जणांच्या डोक्यावर दहा बाचके पाहटचे ४ वाजतात की नाही तोच यांच्या प्रवासाची सुरवात सुरू व्हायची जिथे मिळेल तिथे पाणी प्यायचे नाही मिळाले तर आहे तसेच चालत राहायचं जस आयुष्याचं अंतर कापतो तसं रस्त्याचं अंतर कपात ही मंडळी पायी प्रवास करत निघाली होती गावाकडे… त्यांच्या मनामध्ये गावाकडं कधी पोहचेल हे होतं, जेव्हा कधी गाव, वाडी, वस्ती, माणसाचा गोगांट दिसेल तिथे यांचा सर्वांचा मार्ग वेगळा होता पुन्हा हे संकट तळले की पुन्हा हे एकत्र येऊन चालत राहायचे,कारण आज राज्यात व ग्रामीण भागात जि गंभीर परिस्थिती आहे,त्यामुळे मोठे धोक्यातचे वातावरण तयार होत आहे. आज जर ग्रामीण भागात एखादा अनोळखी वाटसरू दिसला तर गाववाले व गावातील काही टवाळखोर कुठल्याही प्रकारची माहिती न घेता या लोकांना चोर, करोना बाधित लोक म्हणून अडवून त्यांना शिवीगाळ करणे हनामार करण्यास सुद्धा काहीजण मागे पुढे पाहत नाहीत.
हे लोक असंच दिवसभर प्रवास करत रात्री अंधार पडायला लागला की कुठेतरी आडोसा आडवळणी जागा बघून त्या ठिकाणी थोडाफार जेवण (फरसण, शिळ्या भाकरी, बिस्कीट, चिवडा खाऊन) करून हे लोक रात्रभर जीव मुठीत धरून कसेतरी पाहटचे ४ कधी वाजतात याकडे लक्ष वेधून असतं, एकदा पाहटचे ४ वाजले पुन्हा यांचा प्रवास रोजच्या सारखा सुरूच राहतो.
आज दि.११ रोजी यांनी बीड जिल्ह्यात प्रवेश केला कालची रात्री ते जामखेड तालुक्यातील साकत या गावाजवळ मुक्कामी होते सकाळी पुन्हा त्यांचा प्रवास सुरू झाला,आडवळणी वाटाने त्यांनी साकत गाव ओलांडून बीड जिल्ह्याच्या सिमेत प्रवेश केला पाटोदा गांधनवाडी ढाळेवाडी या गावच्या शिवारातून ते पुढे पुढे चालत होते गावकऱ्यांमुळे मला यांची माहिती मिळाली असे लोक आहेत व ते ऊसतोड करणारे लोक आहेत व माजलगावकडे चालले आहेत ही माहिती मिळाली व लगेच त्यांचा पाठलाग करत निघालो अनेक वेळा त्यांना थांबण्याची विनंती केली विनवणी केली पण ते आधीच भीतीमुळे परेशान होते,मग क्षणांचा विलंब न लावता नफरवाडी येथील मित्र प्रकाश सावसे, बाबू सावसे, सुशेन सावसे यांना कॉल करून सर्व माहिती दिली व त्यांना समोरून त्यांना थांबवण्यासाठी विनंती केली त्यांनीही बराच पळ काढला पण ते थांबायला तयार नव्हते शेवटी सर्वांनी मिळून त्यांना नफरवाडीच्या समोर शेतामध्ये त्यांना गाठले व त्यांना विनंती केली,तुम्ही पळ काढू नका तुम्हाला तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून जेवणाची राहण्याची आरोग्यासाठी सर्व सोय केली जाईल, त्यांच्या गावाकडील सामाजिक कार्यकर्ते व ऊसतोड कामगारांसाठी काम करणारे मोहन जाधव यांच्याशी फोन करून त्यांचा संवाद करून दिला, त्याच बरोबर नफरवाडी गावचे सरपंच बंडू सावसे,करोना जनजागृती नियुक्त अधिकारी बिनवडे सर, पारगावचे ग्रामस्थ गणेश दळवी व अन्य लोकांनी त्यांना विनंती केली, पण ते थांबण्यासाठी तयार नव्हते, शेवटी त्यांच्या माजलगाव तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्ते व नेते यांच्याशी चर्चा करून त्यांना जवळचा रस्ता दाखवला व त्यांना काही संपर्क देऊन जाण्याची विनंती केली..!
हा सर्व प्रकार पाहून मनामध्ये हळहळ व्यक्त होत होती,त्यांनाही पाटोदा येथे थांबावे वाटत होते,पण पुन्हा त्यांना त्यांच्या गावाकडच्या कुटुंबाची काळजी वाटायची, उपाशीपोटी डोक्यावर ऊन घेऊन दिवसभर चालणे,डोक्यावर गाठोडे (पिशव्या) जवळ जेवणासाठी काहीही उपलब्ध नाही,खरंच हा सर्व प्रकार हाताळताना पाहताना त्यांना विनंती करताना मन हेलावून जात होतं, पुन्हा मनामध्ये प्रश्न उभा राहायचा आपलं जस कुटुंब आहे तसेच यांचंही कुटुंब असेल यांच्या आयुष्यातली ही फरपट कधी संपेल की नाही हा प्रश्न उपस्थित होतो..!
संक्षिप्त शब्दांकन
इंजि.दत्ता बळीराम हुले
ऊसतोड मजुर पुत्र पाटोदा