जिल्हाधिकाऱ्यांच्या धान्यवाटपाला जिल्हा पुरवठा विभागाचा खोडा ,ढीसाळ कारभार ,चौसाळा गोदाम रक्षकाला निलंबित करा― डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―जिल्हाधिकारी बीड मा.राहुलजी रेखावार यांनी कोरोनाची राष्ट्रीय आपत्ती निवारण करण्यासाठी गोरगरीबांची उपासमार होऊ नये यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील प्रती लाभार्थी मोफत ५ किलो तांदूळ उपलब्ध करून दिला असताना जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा समन्वय नसल्याने आणि चौसाळा येथिल गोदाम रक्षक किशोर जवंजाळ यांच्या हलगर्जीपणामुळे धान्य वाटपास उशीर होत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना गोदामातून धान्य उचलण्याची परवानगी द्यावी त्यामुळे धान्य वाटपास उशीर होणार नाही यास जबाबदार गोदाम रक्षक किशोर जवंजाळ यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे केली आहे.

बीड तालुक्यातील मौजे गोगलवाडी ग्रुप ग्रामपंचायत असून मौजे रौळसगांव ग्रामपंचायत अंतर्गत येते. येथिल स्वस्त धान्य दुकानदार अंकुश भगवान जगताप म्हणतात चौसाळा गोदाम रक्षक कीशोर जवंजाळ यांनी अजुन पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील मोफत तांदूळ वाटप करण्यात आले नाही.याप्रकरणी चौसाळा गोदाम रक्षक किशोर जवंजाळ यांच्या कडे विचारणा केली असता माझ्याकडे नेकनुर आणि चौसाळा येथिल दोन गोदाम आहेत‌.त्यामुळे २-३ दिवस लागतील, गोदाम रक्षकांच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीबांची उपासमार होऊ लागली आहे.त्यामुळे या प्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करुन किशोर जवंजाळ यांना निलंबित करण्यात यावे.अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.

अंकुश भगवान जगताप ( स्वस्त धान्य दुकानदार )

गोगलवाडी गावात २४९ मतदार असुन एकुण ९४ रेशन कार्डधारक आहेत.३६ बीपीएल , ३ अंत्योदय आणि ५५ शेतकरी लाभार्थी योजनेतील.पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील मोफत तांदूळ आलाच नाही. चौसाळा येथिल गोदाम रक्षकाने धान्य पाठवलेच नाही.पेपरमधिल धान्यवाटपाचे फोटो पाहून मागणी करण्यात येते परंतु वरुनच धान्य मिळाले नसल्याने ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागते.

प्रविण जगताप ( ग्रामस्थ):

आमच्या गावात रेशन धान्य वाटप नाही, तुमचे फेसबुकवर/ पेपरमधे नाव पाहीले तहसिलदार याना फोनवरून बोलून आपण आमच्या गावाला न्याय मिळवून द्यावा यासाठी तुम्हाला गावी या अशी विनंती आहे.

शिवाजी / संभाजी बन्सड (ग्रामस्थ)

आम्हाला शेतजमिनी असल्यामुळे मजुरी करुन खात असतो, सध्या कामधंदा नाही आणि संचारबंदी असल्यामुळे उपासमार होऊ लागली आहे.स्वस्त धान्य दुकानदार यांना विचारले असता वरुनच आले नाही म्हटले जाते.

प्रविण जोगदंड / कीसन जगताप
(ड्रायव्हर )

आम्ही ड्रायव्हर आहोत ,आम्हाला दुसरं काम येत नाही, काम भेटंना, राशन भेटेना ,आम्ही खायचं काय आणि जगायच कसं ??

गंगुबाई जगताप ,मंगल जगताप, लक्ष्मी डिसले , नंदुबाई जगताप (ग्रामस्थ महिला)

पेपर मध्ये वाटप दिसतंय , दररोज स्वस्त धान्य दुकानदारांच्या दुकानात चकरा मारतोय , दुकानदार म्हणतेत वरूनच आलं नाही , सगळ्यांना मिळतंय मग आमालाच कवा मिळणार ,मजुरी बंद झाली ,कामं मिळंना मग आम्ही जगायचं कसं तुम्हीच सांगा , आजच्या आज रेशन मिळायला फाईजी.

डॉ.गणेश ढवळे :

जिल्हाधिकारी बीड यांनी दिलेल्या आदेशानुसार पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील मोफत तांदूळ उपल्ब्ध असुन देखील जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे ढीसाळ नियोजन आणि चौसाळा गोदाम रक्षक किशोर जवंजाळ यांच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीबांची उपासमार होते आहे, जिल्हाधिकारी यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना गोदामामधून धान्य वाटपाचे आदेश देण्यात यावेत ज्यामूळे धान्य वाटपास उशीर होणार नाही आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल चौसाळा गोदाम रक्षक किशोर जवंजाळ यांना निलंबित करण्यात यावे.