कोरोना विषाणू - Covid 19जळगाव जिल्हापाचोरा तालुकाब्रेकिंग न्युज

निर्मल सिडस्‌ प्रा. लि. पाचोरा या कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून “मुख्यमंत्री सहाय्यता निधी" १८ लाख व पि. एम. सहाय्यता निधी १५ लाख रुपये रुपयांची मदत

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―कोविड - १९ (कोरोना) या विषाणुने संपुर्ण जगभरात थैमान घातले असुन संपुर्ण मानवजात आज प्रंचड दहशतीखाली आहे. या वैश्विक संकटाला तोंड देण्यासाठी भारत देशसुध्दा सज्ज होऊन जीवाची बाजी लावत आहे. परंतु देशातील वाढणारा कोविड - १९ या कोरोना विषाणु ग्रस्तांचा आकडा अतिशय चिंताजनक असुन भारतात अनेक बिकट सामाजिक आणि आर्थिक प्रश्न उभे राहिले आहेत. देशात कोविड -१९ कोरोना विषाणू या साथरोगाचा संसर्ग टाळण्यासाठी, त्याचा प्रसार थांबविण्यासाठी शासन व प्रशासनाकडून युध्द पातळीवर विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अशा या वैश्विक संकटाच्या काळात शासन व प्रशासनाला पुर्णपणे सहकार्य करणे अतिशय गरजेचे आहे.
निर्मल सिडस्‌ प्रा. लि. पाचोरा या कंपनीतील सर्व अधिकारी व कर्मचारी हे कोविड १९ कोरोना विषाणुच्या युध्दात शासन व प्रशासन यांना सहकार्य करण्यासाठी आर्थिक बळ घेऊन समोर आले आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मदतीसाठी केलेल्या आवाहानास विनम्रपणे प्रतिसाद देऊन स्वइच्छेने "मुख्यमंत्री सहाय्यता निधी - कोविड १९” साठी रुपये १८ लाख रुपयांची व पि. एम.निधी, १,५००,००० मदत केली असुन उपरोक्त रक्कम माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली "मुख्यमंत्री सहाय्यता निधी - कोविड १९” या खात्यात दि. १६ एप्रिल रोजी जमा करण्यात आली आहे.
आपण सर्वांनी शासन व प्रशासनाच्या सुचनांचा आदर करुन सोशल डिस्टंसिंग पाळुन सहकार्य करावे असे विनम्र आवाहन आम्ही निर्मल सिडस्‌च्या माध्यमातुन सर्व जनतेला करीत आहोत. असे आवाहन निर्मल सिड्सचे महाव्यवस्थापक सुरेश पाटील यांनी केले आहे.