परळी:आठवडा विशेष टीम― सद्य स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यातच उपाययोजना सुरू आहेत. त्यातच रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी सुरक्षेच्या उपाययोजना अद्यापही पुरेशा प्रमाणात उपलब्ध यालेल्या नाहीत ही बाब योगेश पांडकर यांच्या लक्ष्यात आली असता त्यांनी नव्याने सुरू केलेल्या फळ विक्री च्या व्यवसायाच्या नफ्यातून मा. पंकजाताई गोपीनाथ मुंडे व मा.खा. प्रितमताई गोपिनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सद्य परिस्थितीत पांडकर यांनी दिलेल्या सेफ्टी किटचा डॉक्टरांना चांगलाच आधार होत आहे. शासकीय रुग्णालयात या किटचे मोफत वाटप भाजप युवा मोर्चाचे नेते योगेश पांडकर यांनी केले आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ सोबतच सॅनिटायझरचा वापर हे प्रभावी उपाय आहेत. त्यापैकी रुग्णांसोबत संपर्क येणाऱ्या डॉक्टरांना ‘सोशल डिस्टन्सिंग’ चा पर्याय वापरता येत नाही. त्यांना सतत रुग्णांच्या संपर्कात राहावे लागते . या परिस्थितीत विषाणूचा शरीराशी संपर्क न येणारी साधने वापरणे गरजेचे आहे. त्यासाठी सेफ्टी किट उपयुक्त आहे.