आठवडा विशेष|प्रतिनिधी
परळी दि ३१ : बाबासाहेबांची पत्रकारिता लोकशाहीला दृढ करणारी असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम यांनी मूकनायक दिनानिमित्त आयोजित लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे कार्यक‘मात अध्यक्षीय भाषणात केले. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दैनिक सम‘ाटचे पत्रकार रानबा गायकवाड यांचा मूकनायक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक‘माचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन इंजि. भगवान साकसमुद्रे यांनी केले. साकसमुद्रे पुढे म्हणाले की, यावर्षी मूकनायक या वर्तमानपत्राला ९९ वर्षे झाली. बाबासाहेबांनी मूकनायकसह बहिष्कृत भारत, समता आणि प्रबुद्ध भारत सारखे वर्तमानपत्र काढले. त्यांची पत्रकारिता त्यांच्या कल्पनेतील आदर्श समाज, स्वातंत्र्य, समता, व मित्रत्व यावर आधारित नवसमाज निर्मितीसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केले. यावेळी पत्रकार मोहन व्हावळे, दै. दिव्य मराठीचे प्रतिनिधी धनंजय आढाव, सुकेशिनी नाईकवाडे, संभाजी मुंडे, संजीव राय, प्रा.दशरथ रोडे, अनिसचे तालुका अध्यक्ष विकास वाघमारे, प्रा. विलास रोडे, ऍड. कपिल चिंदालिया, बापू गायकवाड, संजय व्हावळे, प्रा.दासू वाघमारे, नवनाथ दाने, निलेश सगट, किरण लोंढे, आकाश देवरे, ओमप्रकाश शिंदे, प्रकाशसिंग तुसाम, जितेंद्र मस्के, के. डी. उपाडे, सिद्धांत लांडगे आदि उपस्थित होते.